हल्दवानी (प्रतिनिधी): उत्तराखंडात सुरू असलेल्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने जलतरणामध्ये सलग दुसर्या दिवशी पदकांचा चौकार झळकविला. सान्वी देशवालचे सोनेरी यश संपादले. चार बाय शंभर मीटर मिडले रिले शर्यतीमधील पुरुष गटात कांस्य तर महिला गटात रौप्यपदक मिळाले तर महिलांच्या डायव्हिंग मध्ये ईशा वाघमोडे हिने रौप्य पदक जिंकले
सान्वी देशवाल हिने 4 बाय 100 मीटर्स वैयक्तिक मिडले प्रकारात सोनेरी यश संपादन केले. तिला ही शर्यत पूर्ण करण्यास पाच मिनिटे 5.49 सेकंद वेळ लागला. पुरुषांच्या विभागात चार बाय शंभर मीटर्स मिडले रिले शर्यतीत कास्यपदक मिळवताना महाराष्ट्राच्या संघात ऋषभ दास, पृथ्वीराज डांगे, मिहीर आम्ब्रे हीर गितेश शहा यांचा समावेश होता. त्यांनी हे अंतर पार करण्यास तीन मिनिटे 48.31 सेकंद वेळ लागला
महिलांच्या चार बाय शंभर मीटर्स मिडले रिले शर्यतीत महाराष्ट्राला रुपेरी यश लाभले. ऋजुता राजाज्ञ,ज्योती पाटील, प्रतिष्ठा डांगी व आदिती हेगडे यांच्या समावेश असलेल्या महाराष्ट्राने ही शर्यत चार मिनिटे 31.29 सेकंदात पार केली. मुलींच्या दहा मीटर प्लॅटफॉर्म ड्रायव्हिंग प्रकारात महाराष्ट्राच्या ईशा वाघमोडे हिला रौप्य पदक मिळाले तिने या प्रकारात 175.50 गुणांची नोंद केली.