औरंगाबाद (प्रतिनिधी):वृंदावन (उत्तर प्रदेश) येथे झालेल्या राष्ट्रीय फ्लोअर बॉल पंच परिक्षेत औरंगाबादच्या स्वप्नील गुडेकरने अ श्रेणीत यश मिळवले. या परिक्षेत देशभरातून १३० जणांनी सहभाग घेतला होता. तो उत्कृष्ट राष्ट्रीय खेळाडू आहे.
त्याने अनेक राज्य स्पर्धेत पंच म्हणून यापूर्वी कामगिरी केली आहे. हा खेळ जगभारत जवळपास ८० देशात खेळला जातो. परिक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल फ्लोअर बॉल ऑल इंडियाचे उपाध्यक्ष अतुल गुप्ता, क्रीडा उपसंचालक विजय संतान, रवींद्र चोथवे यांच्या हस्ते त्याला प्रमाणपत्र देवून गौरवण्यात आले.
त्याच्या यशाबद्दल मृणाल नॉगेन, बाजीराव भुतेकर, डॉ. उदय डोंगरे, चिंतामण गुडेकर, विद्यापीठाचे क्रीडा विभाग संचालक डॉ. रंजन बडवणे, प्रा. सागर मगरे, निर्मला गुडेकर, विद्या शिंदे, विशाल जाधव, विनोद डोके आदींनी अभिनंदन केले.