औरंगाबाद (प्रतिनिधी):भारतीय नेट बॉल महासंघाच्यावतीने श्री बालाजी सीनियर सेकंडरी स्कूल, भिवानी (हरियाणा) येथे २५ ते २९ मार्च आणि ३० मार्च ते ३ एप्रिलदरम्यान आयोजित ३४ व्या राष्ट्रीय ज्युनियर व सिनिअर नेट बॉल स्पर्धेसाठी औरंगाबादच्या जयवर्धन इंगळे, अनिल वाघमारे, अजय राजपूत यांची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे.
जयवर्धनला कनिष्ठाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली असून वाघमारे व राजपूत वरिष्ठ संघात प्रतिनिधीत्व करतील. जयवर्धन हा सम्यक पब्लिक ज्युनिअर कॉलेजचा अकरावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी आहे. या तिन्ही खेळाडूंनी यापूर्वी राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे.
या खेळाडूंना औरंगाबाद जिल्हा संघटनेचे सचिव तथा प्रशिक्षक सतीश इंगळे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. त्यांच्या निवडीबद्दल राज्य संघटनेचे अध्यक्ष बिपिन कामदार, महासचिव डॉ. ललित जिवाणी, सहसचिव श्याम देशमुख, कोषाध्यक्ष डॉ. एस. एन. मूर्ती, जिल्हा संघटनेचे सुनील डावकर, धर्मेंद्र काळे, रमेश प्रधान, भक्ती देशमुख, पुजा सोनवणे, आकाश सरदार, सचिन दांडगे, अमरदीप नवगिरे, अनिल मोटे, दिलीप जाधव, अतुल पगडे, विक्रम सिंग कायटे, तालिब अन्सारी, विक्की शेजूळ आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.