ब्रेकिंग! प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांच्यावर हल्ला, ऑनलाईन संवादादरम्यान घडलेला प्रकार कॅमेरात कैद

क्रिकेटविश्वातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांच्यावर हल्ला झाल्याचे वृत्त आहे. सोशल मीडियावर हर्षा भोगले यांचा एक भयावह व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. त्यांच्यावर झालेल्या या हल्ल्यामुळे चाहत्यांनाही धक्का बसला आहे. मात्र, आता यावर खुद्द हर्षा भोगले यांनी ट्वीट करत मी ठीक असल्याचे सांगितले आहे.

झालं असं की, हर्षा भोगले इंस्टाग्रामवर लाईव्ह सेशन करत होते. दरम्यान, अचानकच या लाईव्ह सेशलमध्ये त्यांच्यासोबत काहीतरी झाल्याचे अँकरला जाणवले. त्यावेळी त्यालादेखील धक्का बसला. हा व्हिडिओ ट्विटरवरून डिलीट करण्यात आला आहे. मात्र, हा व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल होत आहे.

भोगले ज्या अँकरसोबत बोलत होते, तो असे म्हणाला की, “सर्वांना नमस्कार, काय झाले याबद्दल आम्हाला खात्री नाही. आम्ही हर्षा भोगले आणि त्यांच्या टीमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्हाला काही माहिती मिळताच आम्ही तुम्हाला तातडीने कळवू.”

दरम्यान, प्रसिद्ध क्रीडा पत्रकार सुनंदन लेले यांनी ट्वीट केले आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “हर्षा भोगले ठीक असून घाबरण्याची काहीही गरज नाही.”

हर्षा भोगलेंचं ट्वीट
“मी ठीक आहे. तुम्हाला खूप काळजी वाटली म्हणून क्षमस्व. प्रेम आणि काळजीबद्दल धन्यवाद. तो माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त व्हायरल झाला. तेही शिकण्यासारखे आहे. काहीतरी वेगळं घडवायचं होतं. क्षमस्व. आणि चिअर्स.”

हर्षा हे क्रिकेट विश्वातले प्रसिद्ध समालोचक आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये समालोचन केले आहे. विशेष म्हणजे, ते १९ वर्षांच्या वयापासून समालोचन करत आले आहेत. त्यांनी आतापर्यंत सहा आयपीएल स्पर्धा, पाच चॅम्पियन्स लीग आणि पाच टी-२० विश्वचषकांसह चारशेहून अधिक वनडे आणि शंभराहून अधिक कसोटी सामन्यांत समालोचन केले आहे.

You might also like

Comments are closed.