सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा2022; बूनस्कूल, गुरूकुल औलिंपियाड, आझाद, समंतभद्र शाळांना विजेतेपद

संभाजीनगर (प्रतिनिधी):क्रीडा व युवक सेवा संचालनालय महानगरपालिका जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय क्रीडा संकुल गारखेडा येथे आयोजित सुब्रतो मुखर्जी आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत शहर विभागात १४ वर्षांखालील गटात बून स्कूलने शानदार कामगिरी बजावत औरंगाबाद पोलिस पब्लिक हायस्कूल चा टायब्रेकरवर ३-१ असा पराभव करत विजेतेपद पटकावले.
यात तसेच १७ वर्षांखालील मुलींच्या गटातील अंतिम लढतीत गुरूकुल औलिंपियाड तर १७ वर्षांखालील मुलांच्या गटात मौलाना आझाद १-० असा पराभव केला, यात आर्या कुलकर्णी हिने एकमेव गोल केला.१७ वर्षांखालील मुलांच्या गटात मोईन उल उलुम हायस्कूल संघावर वुडरिज हायस्कूलने २-० अशी मात करत बाजी मारली.या मुकाबल्यात शेख सैफ, मोहम्मद आतिफ यांनी प्रत्येकी एकेक गोल केला.
महानगरपालिका हद्दीबाहेरील विभागात १७ वर्षांखालील गटात स्टेपिंग स्टोनने टायब्रेकरमध्ये न्यू बिगिनिंगचा ३-२ असा पराभव केला.तर गुरूदेव समंतभद्र हायस्कूल वेरूळ संघाने प्लर्स अकादमीचा १-० असा पराभव केला, यात कल्याणी जांगडेने एकमेव गोल केला .
स्पर्धेचे पारितोषिक वितरण जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण, जिल्हा क्रीडा अधिकारी शरद कचरे, स्वच्छता दूत भगतसिंग दरख , क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे, पंडित चव्हाण, लता लोंढे , गोकुळ तांदळे, क्रीडा मार्गदर्शक संजय गाढवे, उमर खान, स्टिफन डिसूझा, मोहम्मद रियाजउद्दीन , शेख आदींच्या उपस्थितीत झाले.
पंच म्हणून हामेद शेख, शेख अकील, सय्यद ताजुउद्दीन, आकीब सिद्दिकी, तांत्रिक अधिकारी सय्यद सलिमउद्दीन, आरिफ अली, शेख बाबर ,अझर बाबर शेख, रऊफ खान,एम.ए.बारी यांनी काम पाहिले.
Comments are closed.