सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल चषक 2022; 17 वर्ष वयोगटातील मुलींमध्ये न्यु बिगीनींग स्कुल विजयी गुरूदेव समंत भद्र,वेरुळ उपविजयी

संभाजीनगर (प्रतिनिधी): क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य,पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,संभाजीनगर  द्वारा महानगर पालिका हद्दी बाहेरील जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी चषक फुटबॉल क्रीडा स्पर्धा विभागीय क्रीडा संकुल गारखेडा येथे आयोजित सुब्रतो मुखर्जी आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत ग्रामीण विभागात १७ वर्षां गटातील मुलींच्या संघामध्ये  न्यु बिगीनींग स्कुलने शानदार कामगिरी बजावत गुरूदेव समंतभद्र विद्यामंदिर, वेरुळ चा २-१ असा पराभव करत विजेतेपद पटकावले. बेस्ट परफॉरमन्स म्हणून महक कनकरय्या, वैष्णवी कापडे, श्रेयस बंगाळे,नेहा जंघाळे, ईश्वरी गोटे, तनुश्री गायकवाड यांना सन्मानित करण्यात आले.

विजयी उपविजयी संघाचे जिल्हा क्रीडा अधिकारी,संभाजीनगर शरद कचरे , प्रा. फुलचंद सलामपुरे, सेवा निवृत्त क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करुन गुणगौरव करण्यात आले. पंच अधिकारी म्हणून ताजुद्दीन,तारीख चाऊस, आरशाद खान, फिरोज बेग, शेख रफिक, शेख रशीद, मोहम्मद रियाजुद्दीन यांनी काम केले.

यात तसेच 14  वर्षांखालील मुलेच्या गटातील पहिल्या सामन्यात अल इरफान खेलताबाद विरुध्द पर्ल्स ॲकॅडमी चा टायब्रेकरवर 5-0 असा पराभव करत मोहम्मद जैद-4, आणि अब्दुल्लाह खान-1 यांनी प्रत्येकी गोल करत संघास विजय मिळून दिला. दुसऱ्या सामन्यात  डिफेन्स ॲकॅडमी विरुध्द आर्य चाणक्य स्कुल चा टायब्रेकरवर 3-0 असा पराभव मीत बोरसे-2, हर्षवर्धन-1 यांनी प्रत्येकी गोल करत संघास विजय मिळून दिला.

चौथ्या सामन्यात अल इरफान खुलताबाद विरुध्द स्टेपींग स्टोन टायब्रेकरवर 2-0  अब्दुल्लाह, फारुखी साफी प्रत्येकी एकेक गोल केला. पाचव्या सामन्यात डिफेन्स करीयर ॲकॅडमी विरुध्द पोदार सुंदरवाडी टायब्रेकरवर 2-0 असा पराभव मीत बोरसे 2 करत संघास विजय मिळून देण्यात खारीचा वाट दिला. दिवसच्या अंतिम सामन्यात राष्ट्र माता इंतिदा गांधी सै. विरुध्द पीएसबीए टायब्रेकरवर 3-0 असा पराभव करत राज पावरा-2 , इशान पाडवी-1 यांनी प्रत्येकी गोल करत संघास विजय मिळून दिला.

उद्या होणारे मनपा हद्दीबाहेरील 14 वर्ष मुलांचे क्वार्टर फायनल 

१. स्टेपींग स्टोन सावंगी विरुध्द अल इरफान खुलताबाद

२. राष्ट्र माता इंदिरा गांधी सैनिका शाळा विरुध्द डिफेन्स करीयर ॲकॅडमी स्कुल

या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा अधिकारी लता लोंढे, पंडीत चव्हाण यांचे सह कार्यालयातील सर्व कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.

 

 

 

 

You might also like

Comments are closed.