संभाजीनगर (प्रतिनिधी): क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय संभाजीनगर आणि संभाजीनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या सुब्रतो मुखर्जी चषक फुटबॉल क्रीडा स्पर्धा 2022-23 आज दिनांक 18-7-2022 रोजी संपन्न झालेल्या स्पर्धेमध्ये पोदार आय.सि. एस. इ विरुद्ध रियान इंटरनॅशनल स्कूल स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचले. आज झालेल्या सामन्यांमध्ये सुप्रीम ग्लोबल स्कूलच्या शेख शहाबाद याने स्पर्धेची गोलची पहिली हॅट्रिक मारून आपल्या संघाला जिंकून देण्यास मदत केली. या विजयी संघास जिल्हा क्रीडा अधिकारी शरद कचरे, मनपा क्रीडा अधिकारी संजीव बाल्लीया यांनी शुभेच्छा दिल्या.
तसेच पंच अधिकारी म्हणून ताजुद्दीन,तारीख चाऊस, आरशाद खान फिरोज बेग, शेख रफिक, शेख रशीद, मोहम्मद रियाजुद्दीन, क्रीडा अधिकारी लता लोंढे उपस्थित होते. आज झालेल्या सामन्यात हर्ष शिंदे, जुबेर खान, आर्यन अमीर, ओम पाटील, आदित्य पठारे, शेख शाहबाज, यश कोतवाल, शेख शदाब,जाईद हाश्मी,आर्या दरक यांनी प्रत्येकी 1-1 गोल करून आपल्या संघांना जिंकवण्यात भरीव योगदान दिले.
सामन्यांचे निकाल
1)पोदार आय.सि. एस. इ वि.वि रेयान इंटरनॅशनल स्कुल (2-0)
2) गुरुकुल ओलंपियाड वि.वि. रिवेल्डल स्कूल(4-0)
3) डॉक्टर देसरडा पब्लिक स्कूल वि. वि होली क्रॉस (3-2) ट्राय ब्रेकर
4) आर जे इंटरनॅशनल स्कूल वि. वि पिरॅमिड स्कूल(2-0)
5) सुप्रीम ग्लोबल स्कूल वि. वि द जैन इंटरनॅशनल स्कूल (3-0)
4) एमजीएम क्लोवर डेल वि. वि शिशू विकास स्कूल (2-0)
5) वंडरिंग स्कूल वि. वि मॉडेल इंग्लिश स्कूल (3-0)
बुधवार 20.07.2022 रोजी होणारे सामने
१७ वर्षांखालील मुले
1. 8.00. वाजता सकाळी
वुडरिज स्कूल v/s मोईन उल उलूम शाळा
2. 9.00 वाजता सकाळी
मौलाना आझाद हायस्कूल. v/s बून इंग्लिश शाळा
3. 10.00. वाजता सकाळी
मौलाना आझाद कॉलेजv/s डॉ देसरडा शाळा
4. 11.00. वाजता सकाळी
एमजीएम क्लोव्हरडेल v/s ए, खराब पोलिस पब्लिक स्कूल
पहिली सेमीफायनल. 2.00 वाजता दुपारी
दुसरा सेमीफायनल.3.00 वाजता दुपारी