ग्रीन रिव्होटलुशन मैरेथोन स्पर्धा बाळू, प्राजक्ता २१ किमीचे विजेते अश्विनी, प्रशीक दहा किमीमध्ये अव्वल

संभाजीनगर (प्रतिनिधी): वसंतराव नाईक महाविद्यालयातर्फे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ” ग्रीन रिव्होटलुशन मैरेथोन” स्पर्धेत २१ किलोमीटर अंतराच्या खुल्या पुरूष गटात सातारा येथील वेगवान धावपटू बाळू पोपट पुकाळे तर महिला गटात नागपूरच्या प्राजक्ता गोडबोले यांनी आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी बजावत विजेतेपद पटकावले.तसेच दहा किलोमीटर पुरूष गटात अमरावतीचा प्रशीक अनंत थेटे आणि मुलींमध्ये अश्विनी मदन जाधव यांनी विजयी कामगिरी केली.

खुल्या पुरूष गटातील विजेता बाळू याने ही स्पर्धा गाजवताना प्रदीर्घ २१ किलोमीटर अंतरास अवघ्या १ तास ४० मिनिटांत गवसणी घातली.तर दिनकर गुलाब महाले या नाशिककर धावपटूंने (१ तास ४८ मिनिटे) वेळ घेत दुसरा अमकितसिंग राजपूत (नाशिक) याने १ तास १ मिनिट २५ सेकंदात हे अंतर पार करत तिसरा क्रमांक पटकावला.

महिलांच्या याच गटात रेश्मा केवटे द्वितीय तर आकांक्षा शेलारला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.दहा किलोमीटर अंतराच्या गटात पुरुषांमध्ये औरंगाबादचा राजदीप राजपूत दुसरा आणि संदीप अंबादास राठोड दुसरा आणि अतुल संतराम बर्डे तिसऱ्या स्थानावर राहिला.

तत्पूर्वी शिवछत्रपती पुरस्कार विजेते बैडमिंटन संघटक/ जिल्हा क्रिकेट संघटनेचे सहसचिव शिरीष बोराळकर यांच्या हस्ते सकाळी सहा वाजता या स्पर्धेस नाईक महाविद्यालय येथे हिरवी झेंडी दाखविण्यात आली.यावेळी वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नितीन राठोड, कोषाध्यक्ष डॉ.बिपीन राठोड, विद्यापीठ सिनेट सदस्य प्रा. डॉ.फुलचंद सलामपुरे, प्राचार्य डॉ.जगदिश भराड, डॉ. सत्यजित पगारे, प्रा. डॉ.दयानंद कांबळे, डॉ.संदीप जगताप, सुत्र संचालक अमरुत बिरहाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

सुरूवातीला २१, त्या नंतर १०आणि पाच किलोमीटर अंतरासाठी धावपटूंना पाहुण्यांनी फलैग औफ दाखविला.विशेष म्हणजे पाच ते व्यस्क नागरिकांनी यात सहभाग घेतला होता.ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉ.युसूफ पठाण, गणपत पवार, राहुल आहिरे, डॉ.शाकेर राजा, शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रा. डॉ.विशाल देशपांडे आदींनी परिश्रम घेतले.

माती वाचवा अभियानाचा संदेश ममता करकेरा ,उमाकांत मुद्दलवार मीरा पन्नकल,विशाल केंद्रे,अनिरुद्ध नाईक,पार्थ कुलकर्णी,कृणाल पटेल,बनशंकरी हिरेमठ,विभूती तारे,वेणू तारे,पार्थ मस्के आदींनी धावपटूंना सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी सुरू केलेल्या ” माती वाचवा हा संदेश दिला.

ज्याद्वारे माती वाचवा मोहिमेबद्दल

2050 पर्यंत, आतापासून तीन दशकांपेक्षा कमी काळात, पृथ्वीच्या 90% शेतजमिनीचे वाळवंटीकरण होत मातीची झीज होण्याचा धोका आहे, ह्या पार्श्वभूमीवर सद्गुरूंनी माती वाचवण्यासाठी जागतिक मोहीम सुरू केली आहे. माती वाचवा मोहिमेचे प्राथमिक उद्दिष्ट जगातील सर्व राष्ट्रांना तातडीच्या धोरणात्मक सुधारणांद्वारे शेतजमिनीत किमान 3-6% सेंद्रिय सामग्री अनिवार्य करण्यासाठी प्रेरित करणे आहे. मृदा शास्त्रज्ञांनी या किमान सेंद्रिय सामग्रीशिवाय जगभरातील सुपीक मातीच्या विनाशाचा इशारा दिला आहे. ही मोहीम शेतकऱ्यांसाठी शेतजमिनींवर सेंद्रिय सामग्री वाढवण्यासाठी सरकार तर्फे आर्थिक प्रोत्साहनाने समर्थित धोरण-चालित आदेश प्रस्तावित करत आहे. हे साध्य करण्यासाठी, मोहिमेचे जगभरातील 60% मतदार – 3.5 अब्ज लोकांपर्यंत पोहोचणे आणि मोहिमेला त्यांचा पाठिंबा स्पष्टपणे व्यक्त करणे आहे, ज्यामुळे निवडून आलेल्या सरकारांना माती अनुकूल धोरणे तयार करता येतील.

 

माती नष्ट झाल्यामुळे जगभरात अभूतपूर्व पर्यावरणीय, आर्थिक आणि सामाजिक आपत्ती येऊ शकतात. यामध्ये तीव्र होणारे हवामान बदल, जागतिक अन्न आणि पाण्याची टंचाई, भीषण नागरी संघर्ष आणि प्रत्येक राष्ट्राची सुरक्षा आणि सांस्कृतिक रचना धोक्यात आणणाऱ्या स्थलांतरचा समावेश आहे.

युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेजर्टिफिकेशन (UNCCD), युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्राम (UNEP), यूएन वर्ल्ड फूड प्रोग्राम आणि इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर (IUCN) द्वारे माती वाचवा मोहमेला पाठिंबा आहे. सद्गुरूंनी 21 मार्चपासून आपला प्रवास सुरू केल्यापासून, जगभरातील 74 राष्ट्रांनी आपापल्या देशांतील माती वाचवण्यासाठी ठोस कृती करण्याचे वचन दिले आहे.असे उपस्थितांच्या मनावर बिंबविणयात आले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल

२१ किलोमीटर पुरूष गट- प्रथम: बाळू पोपट पुकाळे (सातारा: १ तास ४० मिनिटे) द्वितीय (दिनकर गुलाब महाले १: ४८) तिसरा- संदीप अंबादास राठोड (१.१.२५) चौथा- अतुल संतराम बर्डे, पाचवा – विष्णू विठ्ठल लव्हाळे, सहावा- राकेश पवार,सातवा – अंगद कान्हेरे, आठवा-राजू धनवई,नववा-वरद निकालपुरे.

२१ किमी खुला महिला गट- १ प्राजक्ता गोडबोले २ रेश्मा केव्हाटे,३ प्रियंका पाईकराव, ४ प्रमिला पाटील, ५ योगिनी साळुंके, ६ तेजस्विनी लांबखाने,७ प्रमिला बाबरा ८ मौरी पंचवरे, ९ अर्षिका तुमसरे, माधुरी सोनवणे, दीपाली मुळे ‌.

१० किलोमीटर मुले- १ते १० वा क्रमांक – रशिक थेटे,रादीप राजपूत, संदीप राठोड, अतुल बरडे, विशाल लव्हरे,शिवम लोखंडे, वरद निकालपुरे.

१० किमी मुली- अश्विनी जाधव, आरती पावरा, निकिता म्हात्रे, प्रणाली शेगावकर,प्रतीक्षा कापटे, शितल जाधव.

पाच किलोमीटर (१६ वर्षांखालील मुली) गितांजली कदम, महादेवी पांचवरे, सुहानी खोब्रागडे, गोरी पांचवरे.

पाच किलोमीटर मुले- दयाराम गायकवाड, नागराज खुरसाने, भगतसिंग बावी

You might also like

Comments are closed.