सशक्त राष्ट्रासाठी, महिला खेळाडूंनी खेळ अन् शिक्षणातील समतोल साधने गरजेचे;शितोळे

पहिल्या आर.आर भारसाखळे क्रीडा शिष्यवृत्तीचे वितरण.

औरंगाबाद (प्रतिनिधी) सशक्त कुटुंबासोबतच सशक्त राष्ट्र तयार होण्यासाठी,महिला खेळाडूंनी खेळ आणि शिक्षणातील समतोल साधने गरजेचे अाहे. असं मत देवगिरी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे यांनी,महिला महाविद्यालयातर्फे बुधवारी आयोजित केलेल्या राष्ट्रीय आणि राज्यस्तर खेळाडू विद्यार्थ्यांनींसाठी शिष्यवृत्ती प्रदान सोहळ्यात बोलताना म्हणाले.

आर.आर भारसाखळे क्रिडा शिष्यवृत्तीचे वितरण, यंदाच्या वर्षी शहरातील एईव्हीपीएम महिला महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या राष्ट्रीय आणि राज्यस्तर खेळाडूंच्या हस्ते करण्यात आले.बुधवारी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या, शहरातील सिडको भागात कार्यरत असलेले एरव्हीपीएम महिला महाविद्यालयातर्फे राष्ट्रीय आणि राज्यस्तर विद्यार्थींनीचा सत्कार आणि क्रीडामहर्षी आर.आर भारसाखळे शिष्यवृत्ती प्रदान सोहळ्यात,देवगिरी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे तर उपाध्यक्ष प्रा.संजय गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

एरव्हीपीएम महिला महाविद्यालयाच्या संचालिका डॉ.केजल भारसाखळे या अध्यक्षस्थानी होत्या तर प्राचार्य डाॅ.मिलिंद उबाळे यांची मंचावर उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. मानसी बर्दापूरकर यांनी केले.तर प्राचार्य डॉ. मिलिंद उबाळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. स्व. डॉ. आर. आर भारसाखळे यांच्या विविध क्षेत्रातील योगदान अधोरेखित करत त्यांनी घेतलेल्या आशियाई साॅफ्टबॉल स्पर्धेची माहिती दिली. महाविद्यालयातील ७ राष्ट्रीय आणि १ राज्यस्तर महिला खेळाडूंना प्रत्येकी पाच हजार आणि तीन हजार रुपयांची शिष्यवृत्ती देऊन यावेळी गौरविण्यात आले.

विविध अभ्यासक्रमासाठी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या गुणवंत १६ विद्यार्थींनीचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला.

प्रा.संजय गायकवाड यांनी बोलताना, वंचितांना शिक्षणाच्या दारापर्यंत आणण्याचं काम आर. आर भारसाखळेंनी केले. असं मत श्री.गायकवाडांनी व्यक्त केलं.महिला सबलीकरणासाठी नवनवीन संकल्पनांचा अवलंब करून त्यांना पुढे नेण्यासाठी एईव्हीपीएम महिला महविद्यालय नेतृत्व करत असल्याचे संचालिका भारसाखळे म्हणाल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मिलिंद उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.माधवी स्वामी, प्रा.रावी मोरे, प्रा.मनीषा शेजवाळ, प्रा.विनोद कंकाळ,गणेश उकिरडे, अनिकेत गांगे यांनी कार्यक्रम यशस्वीकरण्यासाठी परिश्रम घेतले.

You might also like

Comments are closed.