तामिळनाडू येथे झालेल्या (अंडर 15) राष्ट्रीय फूटसल स्पर्धेत महाराष्ट्र संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्र संघाला पराभूत करून चेन्नईच्या संघाने विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे.
दोन्ही संघांनी स्पर्धेत चांगले प्रदर्शन करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरी अतिशय रोमांचक सामना बघायला मिळाला. निर्धारित वेळेत दोन्ही संघाला गोल करता आले नाही त्यामुळे सामना टाय ब्रेकर च्या मदतीने निकाली लावण्यात आला.
यामध्ये चेन्नईने महाराष्ट्राचा 1-2 अशा फरकाने पराभव करून अजिंक्यपद पटकावले आहे. महाराष्ट्र संघातर्फे कोल्हापूरचा प्रेम याला बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेँट या पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याच्याशिवाय जालन्याचे ऋतिक बगाडिया आणि अर्णव शिंदे यांनीही पूर्ण स्पर्धेत चांगले प्रदर्शन करून उपस्थितांची मने जिंकली. महाराष्ट्र संघाने केलेल्या चांगल्या कामगिरीबद्दल राज्यभरातून त्यांचे कौतुक होत आहे. महाराष्ट्र संघाला युथ फुटबॉल अकॅडमी चे प्रशिक्षक आमिर यार खान यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे.