दुबई-आयपीएल 2021 चा शेवट जवळ आला आहे. नौक आऊट सामन्याला सुरुवात झाली आहे. आज क्वालिफायर मध्ये चेन्नई समोर दिल्लीचे आव्हान होते. या मध्ये ऋतुराज गायकवाड च्या शानदार खेडी च्या बळावर चेन्नईने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दिल्ली जरी पराभूत झाला तरी त्याला अंतिम फेरी गाठण्याची एक संधी मिळणार आहे. 70 धावा करणारा ऋतुराज गायकवाड या सामन्यात सामनावीर ठरला. उद्या एलिमिनेटर मध्ये कोलकाता समोर बेंगलोर चे आवाहन असणार आहे.
नाणेफेक जिंकून चेन्नईने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांची सुरुवात चांगली नाही राहिली. तरीही कर्णधार रिषभ पंत व पृथ्वी शॉ च्या अर्धशतकाच्या बळावर दिल्लीने 172 धावांपर्यंत मजल मारली. चेन्नई कडून हेजलउडणे सर्वाधिक दोन गडी बाद केले. धावांचा पाठलाग करीत असताना चेन्नई ची सुरूवातही चांगली नाही राहीली.
चांगल्या फॉर्मात असलेल्या दुपलेसिस लवकर तंबूत परतला. मात्र नंतर मराठमोळा ऋतुराज गायकवाड व रौबिन ऊथ्थप्पा नेशतकी भागीदारी करून संघाच्या विजयाचा पाया रचला. मध्य पडीत चेन्नईचा डाव थोडा गडगडला. शेवटी सहा चेंडूत 13 धावांची आवश्यकता असताना कर्णधार धोनीने तीन चौकार खेचून संघाला अंतिम फेरीत नेऊन पोहोचवले. चेन्नई कडून ऋतुराज गायकवाड ने 70 रौबिन ऊथ्थप्पा ने अपने 63 धावांचे योगदान दिले. तर दिल्लीकडून टॉम करनणे तीन गडी बाद केले.