जालना(प्रतिनिधी)-महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या क्रिकेट सल्लागार समितीचे अध्यक्ष विजय शेट्टी यांनी महाराष्ट्राच्या रणजी 25,19 16,14 वर्षाखालील क्रिकेट संघ निवड समितीची शनिवारी घोषणा केली. रणजी संघात निवड समितीच्या अध्यक्षपदी कैसर फाकीह यांची नियुक्ती करण्यात आली संतोष झेंडे प्रशिक्षक म्हणून काम पाहतील तसेच राजू काणे यांच्या वर सोळा वर्षाखालील संघ निवड समिती सदस्य पदाची जबाबदारी देण्यात आली. ही समिती 2021-22 सत्रासाठी साठी काम पाहिल. राजू काणे यांनी यापूर्वी 19 वर्षाखालील संघासोबत काम केले आहे उत्तम प्रशिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. तसेच राष्ट्रीय खेळाडू आयपीएल गाजविणारा विजय झोल यांचे ते प्रशिक्षक आहे.
एमसीएच्या क्रिकेट निवड समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे शहरातून तसेच राज्यभरातून स्वागत व कौतुक होत आहे. याच पार्श्वभूमीवर महिला महाविद्यालय येथील ग्राउंड वर खेळाडूंनी तसेच मान्यवरांनी काणे सरांचे सुतार पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी क्रीडा क्षेत्रातील मान्यवर व चैतन्य वायकोस तसेच अकॅडमी चे सर्व खेळाडू उपस्थित होते. जालना शहरात सध्या आपल्या क्रिकेट कौशल्य ने धुमाकूळ टाकणाऱ्या सहा वर्षाचा शौर्य देखील यावेळी उपस्थित होता.
यावेळी स्पोर्ट पनोरमा शी बोलताना राजू काणे सर म्हणाले की, मी आतापर्यंत केलेल्या कामगिरीबद्दल माझी पुन्हा या निवड समितीमध्ये निवड झाली आहे. माझ्यावर दाखविलेला विश्वास मी सार्थक ठरविण्याचा प्रयत्न करेन. तसेच जालन्याच्या व मराठवाड्याच्या क्रिकेट विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा विश्वास देखील दिला.