राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत धनश्री आणि पायल सुवर्णपदक जिंकले

लातूर(प्रतिनिधी)- स्टुडंट्स ऑलिम्पिक असोसिएशन आयोजित ७ व्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत औसा तालुक्यातील हिप्परगा येथील धनश्री दिगंबर तळेकर यांनी १५ वर्ष वयोगटात तसेच चिंचोलीराव वाडी, तालुका लातूर येथील पायल दयानंद बनसोडे यांनी १७ वर्ष वयोगटात सुवर्णपदक जिंकले आहे.
कुमारी धनश्री व कुमारी पायल यांनी केवळ त्यांच्या कुटुंबियांचीच नाही तर संपूर्ण लातूर जिल्हावासियांची मान अभिमानाने उंचावणारी कामगिरी केल्याबद्दल. आज या दोघींचा आमदार अभिमन्यू पवार यांनी सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले. लातूरच्या मातीला कुस्तीत स्वर्गीय हरिश्चंद्रमामा बिराजदार यांचा समृद्ध वारसा लाभला आहे, तो समर्थपणे पुढे नेण्याची उत्तुंग कामगिरी या दोघींच्या हातून भविष्यात घडो अश्या सदिच्छा आमदार अभिमन्यू पवार यांनी दिल्या.
Comments are closed.