यूएई- वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया मध्ये शिखर धवनला वगळण्यात आले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या लिमिटेड ओवरच्या मालिकेमध्ये धवनला कर्णधार केले होते. याच्या नंतर त्याला संघात स्थान न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सध्या धवन यूएई मध्ये आहे तो आयपीएल 2021 च्या दुसऱ्या हाफ मध्ये सहभागी होणार आहे, आयपीएल 2021 मध्ये त्याचा प्रदर्शन शानदार होता. तर आयपीएल 2021 चा दुसरा सत्र 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
संघात स्थान न मिळाल्याने शिखर धवन भलताच दुखी आहे, त्याने इंस्टाग्राम वर स्टोरी शेअर करत एक फोटो अपलोड केली आहे. त्याच्या मध्ये त्याने लिहिले की, हसते रहे क्युकी यही आपकी सबसे बडी ताकत है. शिखर धवन च्या या रिएक्शन ला त्याच्या तलाक आणि टी-20 वर्ल्डकप मध्ये वगळले याची प्रतिक्रिया समजण्यात येत आहे. शिखर धवन चा सध्या तलाक झालेला आहे याची माहिती त्याची पत्नी आयेशा मुखर्जी ने स्वतःसोशल मीडियावर याची माहिती दिली.आयपीएलच्या पहिल्या सत्रामध्ये शिखर धवन ने आठ सामन्यांमध्ये 54.28 च्या ऐवरेज ने 380 धावा केल्या आहेत