जालना (प्रतिनिधी)- : टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र यांच्यावतीने चालू महिन्यात राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी जालना जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनच्यावतीने बारा सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय खुल्या गटाच्या निवड चाचणीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती असोसिएशनचे जिल्हा सचिव संतोष आढे यांनी दिली.
या जिल्हास्तरीय निवड चाचणीद्वारे राज्य स्पर्धेसाठी मुले व मुलींच्या जिल्हा संघाची निवड करण्यात येणार असून निवडण्यात आलेला संघ राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत जालना जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. कोरोना नियमांचे पालन करुन हजर खेळाडूंचीच निवड चाचणी घेण्यात येणार आहे. ही निवडचाचणी जिल्हा क्रीडा संकुल जालना ग्राउंड येथे होणार आहे. निवड चाचणीसाठी इच्छुकांनी 9421318258 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे व जास्तीत जास्त क्रिकेट खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवण्याचे आवाहन जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनच्यावतीने करण्यात आले आहे.