राज्यस्तरीय स्पर्धेत साताऱ्याच्या कन्येचा सुवर्ण पंच.

स्पोर्ट्स पॅनोरमा (प्रतिनिधी )चंद्रपुरात सुरू असलेल्या 20 व्या बॉक्सिंग स्पर्धेत जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय येथील बीए ची विद्यार्थिनी यशश्री धनावडे हिने सातारा जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व करत सुवर्णपदक पटकावले.

यशस्वी ने चार वेळा राष्ट्रीय स्पर्धा खेळले असून रायगडातील प्रतिस्पर्धी खेळाडू वर मात करून या स्पर्धेचा अंतिम सामना जिंकून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. या सुवर्णपदकाचा बरोबरच यशस्वी ची 21 ते 27 ऑक्टोबर दरम्यान हरियाणात होणाऱ्या वरिष्ठ महिला राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली.

यशस्वी च्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे प्राचार्य प्रमोद घाडगे व प्राध्यापकांनी अभिनंदन केले आहे. यशश्री ला महाविद्यालयाचे जिमखाना विभाग प्रमुख प्रमोद चव्हाण व प्रशिक्षक सागर जगताप यांचे मार्गदर्शन लाभले.

You might also like

Comments are closed.