संभाजीनगर(प्रतिनिधी): क्रीडा व युवक सेवा औरंगाबाद यांच्या मालकीच्या पडेगाव गट नंबर 23 औरंगाबाद येथील एकूण 62 आर शासकीय जमिनीवर अतिक्रमण करण्यात आले होते. शासकीय जमिनीवर नदीम मोहम्मद अजमदउल्ला रजाउल्ला , फरहातउल्लानखान हमीदखान, मोहम्मद फरहत अब्बास मोहम्मद अब्दुल खयुम सौदागर, मोहम्मद फजलूरहेमान उवेत मोहम्मद अब्दुल शफा शब्बीर, अजाज अहेमद सिद्दिकी यांनी अतिक्रमण केले होते. या विषयीची बातमी स्पोर्ट्स पॅनोरमा 21 जानेवारी२०२२ रोजी दिली होती. या नंतर जागेचे मूळ मालक क्रीडा व युवक सेवा उपसंचालक संभाजीनगर सुहास पाटील यांच्या तक्रारीनुसार उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अतिक्रमण पाडण्यात आले 10 मार्च 2016 रोजी संभाजीनगर उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार आज दिनांक 8 ऑगस्ट 2022 रोजी अतिक्रमण करण्यात आले.
जिल्हा प्रशासनातील जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्या पुढ्कारा मुळे आणि मार्गदर्शनाखाली अप्पर तहसीलदार संभाजीनगर विजय चव्हाण , मनपा अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम आणि छावणी पोलीस स्टेशनचे निरीक्षक एस.एन. इंगळे, पीएसआय अंबादास मोरे आणि क्रीडा उपसंचालक सुहास पाटील ,जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे, पदनिर्दिशीत अधिकारी वसंत भुये, इमारत निरीक्षक , सय्यद जमशेद,अतिक्रमण हटाव पथकाचे अक्षय मगरे यांच्यासह प्रशासनातील आद्दी आधिकरी उपस्थित होते.
पडेगाव संभाजीनगर येथील गट क्रमांक 23 मधील एक एकर 22 गुंठे या शासकीय मालकी हक्काच्या जागा मोजणीयाबाबत कार्यालयाने दिनांक 19 -11 -2019 रोजी रक्कम रुपये 13,500 रक्कम भरली असून , पडेगाव संभाजीनगर येथील गट क्रमांक 23 मधील एक एकर 22 गुंठे या शासकीय मालकी हक्काच्या जागेत बाबत अजूनही जागा मोजणी झालेली असून जागेचे डिमार्केशन झालेले नसल्याने, जागेवर नदीम यांनी शासनाच्या मालकी हक्काच्या जागेवर प्लॉटिंग केलेली आहे .तसेच शासनाच्या मालकी हक्काच्या जागा भाडेतत्त्वावर दिलेल्या असून त्यावर वाहन दुरुस्तीचे गॅरेज सुरू केलेली आहे ही जागा कार्यालय अंतर्गत येणारे राष्ट्रीय छात्र सेना कार्यालय सुरू करण्याबाबत प्रस्तावित असून मौजे पडेगाव औरंगाबाद येथील गट क्रमांक 23 मधील एक एकर 12 गुंठे या शासकीय मालकी हक्काच्या जागेवर डिमार्केशन लवकरात -लवकर करावी असे आदेश उर्मिला मोराळे यांनी करून देखील कारवाई अद्यापही करण्यात आली नवती. या विषयी संभाजीनगर विभाग उपसंचालक सुहास पाटील यांनी पाठपुरावा करत राहिले आणि त्या पाठ्पुर्वाला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सहकार्य करत या जागे वरचे काढण्यास मार्गदर्शन केले.
मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार व नागरिकांचे फसवणूक झाली आहे ,असे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगली. यापूर्वी जागा खरेदी केली असली व शासकीय जागा असली तरीसुद्धा खात्री करून घ्यावी. आशी माहिती स्पोर्ट्स पॅनोरमाने या पूर्वी दिली होती.
या ठिकाणी काय व्हावे असे खेळाडूंना वाटते
या जागेचा वापर कसा झाला पाहिजे या विषयी क्रीडा प्रेमींनी आपले म्हणणे स्पोर्ट्स पॅनोरमाकडे मांडले कि या जागेवर तालुका क्रीडा स्कूल प्रस्तापित व्हावे तसेच आमखास मैदानची प्रस्थापित असणारी ही जागा न्यायप्रविष्ट असल्याकारणामुळे शासनाकडून आलेला निधी या पूर्वी वापस गेला आहे. हाच निधी पडेगाव येथे असणाऱ्या जागेच्या ठिकाणी तालुका क्रीडा संकुल तयार करण्यात यावे. या भागातील तसेच आजूबाजूच्या भागातील नागरिकांना खेळाकरता मैदान उपलब्ध नसल्यामुळे दूरवर जावे लागते हे मैदान पडेगाव या ठिकाणी झाले तर या भागांत राहणाऱ्या सर्व नागरिकांना पर्वणीय ठरेल आणि या भागातूनही आंतरराष्ट्रीय,राष्ट्रीय,राज्यस्तरिया खेळाडू घडतील या ठिकाणी इन्डोर आणि खुले मैदानी खेळ खेळण्या करता मैदान तयार व्हावे असे या भागातील नागरिकांची ,खेळाडूंची अतोनात इच्छा आहे.
अतिक्रमण व्हिडीओ पाहा
या जागेचा वापर खरच देशाचे सुदृढ, आणि आरोग्यदायी ऑलम्पिक खेळाडू घडण्याकरिता पाऊल उचलणे गरजेचे आहे. तरी क्रीडा खात्यातील आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी प्रयत्न करावा असे खेळाडूंना व नागरीकांना वाटत आहे. येणाऱ्या क्रीडा मंत्री यांनी या विषयी कारवाई करावी नाही तर पुन्हा या जागे वर आजून भूमाफियाने अतिक्रमण करू नये .
क्रीडा विभागाच्या जागेवर अतिक्रमण…