संभाजीनगर(प्रतिनिधी): शिमांतो सिटी,कोची(जपान) येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दिनांक 7 ते 14 ऑगस्ट 2022 दरम्यान विभागीय क्रीडा संकुल औरंगाबाद येथे चौथे प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले.शेवटचे प्रशिक्षण दिल्ली येथे पुर्ण करून संघ दि. 26 ऑगस्ट 2022 रोजी जपान ला रवाना होणार आहे.
शिबिराच्या समारोप प्रसंगी खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यासाठी भारतीय सॉफ्टबॉल महासंघाचे डॉक्टर प्रवीण आणावकर व महाराष्ट्र सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव डॉक्टर प्रदीप तळवलकर, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे हे उपस्थित होते. तसेच याप्रसंगी औरंगाबाद जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव गोकुळ तांदळे,वेटलिफ्टिंग सचिव दीपक रुईकर, गणेश बेटूदे, संतोष आवचार,सागर रुपवते,सचिन बोर्डे,भीमा मोरे,रोहित तुपारे, यश थोरात, ईश्वरी शिंदे, मयुरी चव्हाण आदी उपस्थित होते.
समारोप प्रसंगी सर्व संघातील खेळाडूंना भारतीय सॉफ्टबॉल संघटनेकडून एक ड्रेस,ब्लेजर, स्पोर्ट्स किट, राज्य संघटनेकडून ट्रॅकसुट तर यजमान औरंगाबाद जिल्हा साॅफ्टबाॅल संघटनेकडून किट बॅग देण्यात आली. शेवटी सर्व खेळाडूनी जाता जाता खेळाडूंनी विभागीय क्रीडा संकुलात वृक्षारोपण केले.
भारतीय सॉफ्टबॉल पुरुष संघ पुढीलप्रमाणे
सुमेध तळवेलकर, प्रितेश पाटील, कल्पेश कोल्हे, जयेश मोरे(जळगाव), अभिषेक सेलोकर (नागपूर), व्ही मोहन राव, बिरू बाग, पी आशिष, मानस केसर वाणी, भूपेंद्र कुमार ( छत्तीसगड), अक्षय जमवाल (जम्मू कश्मीर), अजमल पी. पी (केरला) परशुराम (कर्नाटक) स्टीफन राज(पोंदीचारी) संजीत कुमार (उत्तरप्रदेश) राहुल (राजस्थान) व प्रशिक्षक म्हणून शाकेर अली (राजस्थान) अमित कुमार (छत्तीसगड)हे जाणार आहेत.