औरंगाबाद(प्रतिनिधी): औरंगाबाद महानगरपालिका वतीने आयेजित जिल्हास्तरीय खुल्या लॉंग टेनिस स्पर्धा 14 एप्रिल गुरुवार पासून नागरी क्रीडा केंद्र एन-3 लॉंग टेनिस मैदानावर सुरुवात होत आहे. या स्पर्धा पहिल्यांदा औरंगाबाद मनपातर्फे आयोजित करण्यात आलेली असून वयोगट 10 वर्षा अतील ते 65 वर्षाच्या वयोगटात पर्यंत घेण्यात येणार असून या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे असे मनपाचे उपायुक्त तथा क्रीडा विभाग प्रमुख सौरभ जोशी यांनी सांगितले आहे.
तसेच स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रशिक्षक योगेश गायसमुद्रे, दीपा एगडे, डॉ.सुशिल शिंदे, राहुल उगलमुगले, महेश परदेशी, करीमा कालिके आदि परिश्रम घेत आहे.