पुणे। पीवायसी हिंदू जिमखाना आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या वतीने एसपी गोसावी मेमोरियल पुणे आंतरक्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दोन वर्षाच्या कालावधीनंतर शहरात खुल्या आंतरक्लब टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेस 3 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे.
तसेच, ही स्पर्धा पुणे जिल्ह्यांतील सर्व क्लबसाठी खुली आहे. सांघिक प्रकारात हि स्पर्धा होणार असून यामध्ये 2 सामने खुल्या दुहेरी गटात, एक सामना 90 अधिक गटात आणि एक सामना 110 अधिक गटात होणार आहे. स्पर्धेत एकूण 50000 रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहे. याशिवाय या स्पर्धेतील अव्वल तीन संघ जून महिन्यात नाशिक येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य आंतरक्लब अजिंक्यपद स्पर्धेत पुणे विभागाचे प्रातिनिधीत्व करणार आहेत.