औरंगाबाद(प्रतिनिधी): द वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनतर्फे औरं गाबाद जिल्ह्यात फुटबॉल खेळाला चालना देण्याकरिता अॅडव्हॉक कमिटी स्थापन केली आहे. या कमिटीच्या माध्यमातून सर्वप्रथम सिनियर खेळाडूंसाठी फुटबॉल लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल असे अॅडव्हॉक कमिटीने सांगितले.
द वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनने औरंगा बाद जिल्ह्यासाठी स्थापन केलेली अॅडव्हॉक कमिटीतील सदस्य औरंगाबाद शहरात आले होते. त्यांनी एक बैठक घेऊन औरंगाबाद जिल्ह्यात फुटबॉल खेळाला पुन्हा चालना कशा पद्धतीने देता येईल याचा आढावा घेतला. औरंगाबाद जिल्ह्यात फु टबॉलला चालना देण्यासाठी नेमण्यात आलेल्या अॅडव्हॉक कमिटीत औरंगाबादचे फुटबॉल संघटक उमर खान आणि स्टीवन डिसुजा यांचा समावेश आहे. या तिघांच्या माध्यमातून आगामी काळात औरंगाबाद जिल्ह्यात फुटबॉ ल खेळाला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे अॅडव्हॉक कमिटी सदस्यांनी स्पष्ट केले.
अॅडव्हॉक कमिटीचे सदस्य रणजीत भारद्वाज असल्यामुळे या संघटनेतील वाद न संपता हि संघटना हायजॅक होण्याची दाट शक्यता असून फुटबॉल या खेळाचे बाजारीकरण होऊ शकते असे क्रीडा प्रेमींच्या वतीने बोलण्यात येत आहे .
का बोलण्यात येत आहे वाचा
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सचिव नामदेव शिरगावकर यांचे ते निकटवर्तीय असून विश्वासातील व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे. शिरगावकर यांनी विविध संघटनेमध्ये अॅडव्हॉक कमिटी बसून त्यामध्ये आपले निकटवर्तीय सदस्यांना स्थान देण्यात येते आणि संघटने -संघटनेमधील वाद न मिटवता नवीन संघटना स्थापन करून संघटना हायजॅक करण्याचे काम करण्यात येते .
या प्रसंगी अॅडव्हॉक कमिटी चेअरमन सलीम परकोटे, समन्वयक गुडविन डिक, सचिव साऊटर वाझ, कोषाध्यक्ष प्यारेलाल चौधरी, अजहर पटेल, साजीद अन्सारी, उमर खान व स्टीवन डिसुजा यांची उपस्थिती होती.
प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना प्यारेलाल चौधरी, सलीम परकोटे, साऊटर वाझ यांनी औरंगाबाद जिल्ह्यात आगामी काळात रणजित भारद्वाज, उमर खान, स्टीवन डिसुजा यांच्या माध्यमातून सर्वांना सोबत घेऊन फुटबॉल खेळाला चालना देण्यात येणार असल्याचे सांगितले. लवकरच औरंगाबाद जिल्ह्यात क्लब नोंदणीला सुरवात करण्यात येणार आहे. मे महिन्यात सिनियर खेळाडूंसाठी फुटबॉल लीग स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्यादृष्टीने एप्रिल महिन्यात नोंदणीला सुरवात करण्यात येईल. नोंदणी शुल्क एक हजार रुपये व फुटबॉल लीग शुल्क तीन हजार रुपये निश्चित करण्यात आले आहे. एकेकाळी औरंगाबाद जिल्ह्यात फु टबॉलच्या मोठ्या स्पर्धांचे आयोजन होत होते. पुन्हा एकदा सर्वांनी मिळून औरंगाबादच्या फुटबॉलला राज्यात नावलौकिक प्राप्त करुन देण्यासाठी काम करावयाचे आहे. फुटबॉल खेळासाठी स्वतंत्र मैदान असणे नितांत गरजेचे आहे. त्यादृष्टीने अॅडव्हॉक कमिटी निश्चितच प्रयत्न करेल असा विश्वास कमिटी सदस्यांनी दिला.
महाराष्ट्रात कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये फुटबॉल खेळासाठी कशा पद्धतीने सुविधा आहेत, क्रीडांगण नसेल तर त्याठिकाणी क्रीडांगण उपलब्ध करुन देण्याबाबत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
युवा फुटबॉलपटूंना त्यांचे कौशल्य दाखवण्याची व्यापक संधी मिळावी यासाठी आगामी काळात ‘युथ लीग’ स्पर्धा आयोजित केली जाईल. लहान वयोगटापासूनच मुलांना फुटबॉल खे ळाची आवड निर्माण व्हावी म्हणून ‘बेबी लीग’ स्पर्धाही आयोजित करण्यात येईल. सहा ते एकोणीस वर्षांखालील विविध वयोगटात फुटबॉल स्पर्धांचे आयोजन होत असते. तशाच प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन औरंगाबाद शहरा तही केले जाऊ शकते. सर्वप्रथम सिनियर फुटबॉल लीगने सुरवात करण्यात येणार आहे. ही स्पर्धा मे महिन्यात होईल. या स्पर्धेत ४० क्लबचे संघ सहभागी होऊ शकतात. औरंगाबाद जिल्ह्यातील फु टबॉल खेळाला नवी उभारी देण्यासाठी प्रसिद्धी माध्यमांनी सपोर्ट करावा असे आवाहन कमिटी सदस्यांनी यावेळी केले. उमर खान यांनी स्वागत केले. स्टीवन डिसुजा यांनी आभार मानले.
या प्रसंगी सय्यद सलीमउद्दिन, अॅड. शेख साजीद, अरिफ, रऊफ खान, अकिब सिद्दिकी, इम्रान खान, सय्यद नबील, अझर बाबर शेख आदी फुटबॉलपटू, प्रशिक्षक, संघटक उपस्थित होते.