औरंगाबाद (प्रतिनिधी):खेळाडूंच्या पदकामुळे केवळ त्याच्या एकटाचे नाव होत नाही, तर संपूर्ण जिल्ह्याची मान उंचावते. शिवसेना कायम खेळाडूंच्या पाठिशी राहिली आहे, यापुढे ही कायम राहिल. खेळाडूंच्या मदतीसाठी शिवसेना आणि मी कायम तत्पर राहू. आम्ही तुम्हाला आवश्यक ती सर्व मदत करू, असे अाश्वासन माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिली.
पिसादेवी येथे झालेल्या विभागीय बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेतील झेडएस वॉरीयर अकादमीच्या खेळाडूंचा सत्कार खैरे यांच्या हस्ते झाला, या प्रसंगी ते बोलत हाेते. यावेळी अकादमीचे सचिव सय्यद जहूर अली, प्रशिक्षक सद्दाम, जैद, एजाम, सामाजिक कार्यकर्ता फारूक पटेल, वाजेद अली, अब्दुल समी, सय्यद वसीम व सय्यद साजेद आदींची उपस्थिती होती.
विजेते व सत्करमुर्ती खेळाडू :
सुवर्ण – शेख हम्माद अली, दिव्या नितंनवरे, मोहम्मद जैद, सिमरा फातेमा, सना सय्यद, मोहम्मद अरहान, मोहम्मद कैफ, मोहम्मद अफ्फान, ताबिश अहमद, सय्यद इरफान पटेल, तय्यबा फातेमा, उमेमा फिरदोस, मुब्बशिरा फातेमा, नूर बानो, मिर्झा अवेझ बेग.
रौप्यपदक – शेख दानिश, अलफिया पठाण, अबुजर पठाण, रईस शेख, शेख मुईझ, सय्यद जैनब, अब्दुल रहेमान, मिसबा सय्यद, जवेरीया खातून, मंतशा सिद्दीकी, मिर्झा जुबेर बेग, अबू मुआज.
कांस्यपदक – शेख फझीलत