संभाजीनगर(प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल संघटनेच्या मान्यतेने, औरंगाबाद जिल्हा सॉफ्टबॉल असो.यांच्या यजमानपदाखाली व नारायणा व्यायामशाळा व क्रीडा मंडळ संभाजीनगर यांच्या अर्थिक सहकार्याने तसेच जय हिंद क्रीडा मंडळ,एलोरा सिड्स वाळूज संभाजीनगर,भगवान बाबा महिला बचत गट,अल हुसेन एज्युकेशन ट्रस्ट,सय्यद इर्तेमास हुसेन जाफरी संभाजीनगर यांच्या विषेश सहकार्य ने आयोजित 28 वी वरिष्ठ महिला पुरुष सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पुणे,जळगाव, कोल्हापूर, सांगली,नाशिक सोलापूर, यवतमाळ,मंबई इत्यादी संघांनी आपल्या आपल्या गटात वर्चस्व निर्माण करुन हें संघ बाद फेरीतून उप उपानत्य फेरीत प्रवेष केला. जी.एस.टी.आयुक्त जी.श्रीकान्त व स्पर्धा निरीक्षक वरीष्ठ क्रीडा अधिकारी लता लोंढे यांनी पुरूष -महीला खेळाडूंचा परीचय करून खेळाडुंना शुभेच्छा दिल्या .
या स्पर्धेच्या यशस्वीवेतेसाठी महाराष्ट्र राज्यचे क्रीडा मंत्री मा.ना.गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनखली राज्य संघटनेचे सचिव डॉ. प्रदीप तळवेलकर औरंगाबाद जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेवचे अध्यक्ष डॉ.दत्ताभाऊ पाथ्रीकर,डॉ.फुलचंद सलामपुरे,गोकुळ तांदळे यांच्या सह जिल्हा व राज्य सॉफ्टबॉल संघटनेचे सर्व पदाधिकारी, खेळाडू विशेष परिश्रम घेत आहे
सामान्यसाठी पंच म्हणून गणेश बेटूदे,संतोष आवचार,अक्षय बिरादार सागर रूपवते,प्रसेनजीत बनसोडे,सचिन बोर्डे, विकास वानखेडे,सुजय कल्पेकर,सुयोग कल्पेकर, अक्षय येवले,जयंत जाधव, मंदार कुलकर्णी,शंकर अदलिंगे,किशोर काळे,भीमा मोरे,सचिन जाधव,पियुष चांदेकर, यांनी काम पहिले.
आज झालेल्या साखळी सामन्यांचे निकाल
१ :पिंपरी चिंचवड विविअकोला (४-२)होमरण
२:मुंबई वि वि नांदेड
३:नागपुर मनपा विवि अमरावती (३-०)
४:संभाजीनगर बरोबरी लातूर (१-१)
५:सागली विवि ठाणे (७-०)
६:कोल्हापूर विवि नांदेड (६-१)
७:लातूर विवि पिंपरी चिंचवड पुणे (५-०)
८:जळगाव विवि नागपूर मनपा(१०-०)
९:सोलापूर बरोबरी सांगली (१-१)
१०:परभणी विवि अहमदनगर (१०-४)
११:जालना विवि अमरावती (७-०)
१२:नाशिक विवि औरंगाबाद (५-२)
१३:यवतमाळ विवि अकोला (६-१)
१४:पुणे विवि नवी मुंबई (७-०)
१५:जळगाव मनपा विवि नागपुर मनपा (७-०)
१६:सोलापूर विवि लातूर (२-०)
मुली :
१:अमरावती मनपा विवि सांगली (२-१)
२ :सागली विवि जळगाव (६-०)
३:अहमदनगर विवि अकोला (१०-०)
उपउपांत्यपूर्व सामने
१:पुणे मनपा विवि अहमदनगर (१०-०)
अकोला विवि लातूर मनपा (५-०)
३:पुणे विवी नवी मुंबई (७-०)
४:जळगाव मनपा विवि परभणी (७-०)