जालना(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने 26 डिसेंबर 2021 रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी जालना जिल्ह्याच्या संघ निवडण्यासाठी जालना जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन च्या वतीने निवड चाचण्यांचे आयोजन 12 डिसेंबर 2021 रोजी सकाळी नऊ वाजता जिल्हा परिषद हायस्कूल परतुर च्या मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. स्पर्धेला येताना खेळाडूंनी आधार कार्ड बर्थ सर्टिफिकेट दहावी बोर्ड प्रमाणपत्र व दोन पासपोर्ट फोटो सोबत आणावे.यामध्ये मुले व मुलींसाठी सोळा अठरा व वीस वर्षीय तसेच खुले गट असे चार गट राहणार आहे. अधिक माहिती साठी विकास काळे 7350590072 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सचिव प्राध्यापक डॉक्टर बाबू यादव यांनी केली आहे.
खेळाडूचे वयोगट ,जन्मतारीख आणि नियम खालील प्रमाणे
- सोळा वर्षाखालील मुले व मुली 16 जानेवारी 2006 आणि 15 जानेवारी 2008 दरम्यान चा जन्मलेला असावा.4कीमी
- अठरा वर्षाखालील मुले व मुली 16 जानेवारी 2004 आणि 15 जानेवारी 2006 दरम्यान चा जन्मलेला असावा.6कीमी
- 20 वर्षाखालील मुले व मुली 16 जानेवारी 2002 आणि 15 जानेवारी 2004 दरम्यान जन्मलेला असावा.8 कीमी
- खुले गट मुले मुली 10 कीमी असेल.
तसेच जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन असोसिएशनचे प्रमोद खरात आणि एकनाथ सुरवसे यांनी केली आहे.