जालना(प्रतिनिधी)- जिल्हास्तरीय तायक्वांदो असोसिएशन बीड यांच्या वतीने आयोजित जिल्हा तायक्वांदो स्पर्धेत श्री.श्री.रविशंकर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
यशामध्ये विद्यालयातील चागला खेळ करत पृथ्वीराज संजय मुंडे याने 50 ते 65 किलो गटात सुवर्णपदक, यशराज संजय मुंडे याने 50 ते 55 किलो वजन गटात सुवर्णपदक आणि स्वराली श्रीकांत इनामदार या विद्यार्थीनीने 38 ते 41 किलो वजन गटात रौप्य पदक मिळवले आहे.
या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष जुगलकिशोर जैन ,सचिव संतोष पारगांवकर , मुख्याध्यापक मंगेश हंसे तसेच उपमुख्याध्यापक अनिता सुर्यवंशी आणि आदी सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.