ॲथलेटिक्सच्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड चाचणी

औरंगाबाद(प्रतिनिधी): पुणे येथे २१ ते २३ दरम्यान महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीने वरिष्ठ गटाच्या(महिला व पुरुष) तसेच २० वर्षाखालील मुलं व मुलींसाठी राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या औरंगाबादचा संघ निवडण्यासाठी औरंगाबाद जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ॲथलेटिक्स मैदानावर ७ एप्रिल रोजी सकाळी ६ः१५ वाजता जिल्हा निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या स्पर्धेत अडथळा शर्यत, धावणे, चालणे, लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, भालाफेक, हातोडा फेक आदी क्रीडा प्रकाराचा समावेश असणार असून स्पर्धेमधून प्रत्येक क्रीडा प्रकारातील २ विजयी महिला व पुरुष खेळाडूंची निवड, राज्य संघटनेने दिलेल्या पात्रतेच्या निष्करणानुसार औरंगाबाद जिल्ह्याच्या संघात केली जाणार आहे. स्पर्धेकरिता येताना २० वर्षाखालील खेळाडूंनी जन्मतारखेचा दाखला सोबत आणणे आवश्यक असुन

या जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धेसाठी १०० रुपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आलेला आहे. तर जास्तीत जास्त स्पर्धकांनी या जिल्हा निवड चाचणी स्पर्धेत सहभाग नोंदवावा व अधिक महितीसाठी डॉ.दयानंद कांबळे(९८२३०६२५६५) किंवा अनिल निळे(९६०७२३५८५३) यांच्याशी संपर्क साधावा असे आव्हान जिल्हा ॲथलेटिक्स सघंटनेचे अध्यक्ष मा.आ.श्रीकांत जोशी, कार्याध्यक्ष डॉ.रंजन बडवणे, उपाध्यक्ष प्राचार्य शशिकला निलवंत, सचिव डॉ.फुलचंद सलामपुरे आणि कोषाध्यक्ष मोहन मिसाळ यांनी केले आहे.

You might also like

Comments are closed.