छत्रपती संभाजीनगर(प्रतिनिधी)- संस्कार बालक मंदिर प्रशालेतील युवा खेळाडू भक्ती ज्ञानेश्वर जगधणे हिची दिनाक 16 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर2022 दरम्यान तिरुअनंतपुरम केरला येथे होणाऱ्या 31 ऑल इंडिया शूटिंग स्पर्धेसाठी एअर पिस्टल 10 मीटर या इव्हेन्ट साठी तिची निवड झाली आहे.
तिला संग्राम देशमुख यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले, तसेच क्रीडा शिक्षक गणेश बेटूदे यांचेही मार्गदर्शन लाभले या निवडी बद्दल संस्थेचे अध्यक्ष जगदीश देसले , सचिव लीनाजी देसले तसेच प्रशालेच्या मुख्यध्यापिका तळेले ज्योती ,विभागप्रमुख अर्जून दाभाडे , रामेश्वर सहाणे आदी शिक्षक वर्गाने तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. येणाऱ्या काळात भक्ती ही आंतरराष्ट्रीय पातळीवर शाळेचे नाव उंचावेल असे तिच्या क्रीडा शिक्षक मार्गदर्शक पालक यांना आशा आहे.