औरंगाबाद (प्रतिनिधी) सोमवार दि ०३ जानेवारी (आज) शिवछत्रपती महाविद्यालय N-3 सिडको, औरंगाबाद येथे सायं ठीक 6:00 वाजता ऑलम्पिक संघटनेचे महासचिव नामदेव शिरगांवकर तसेच महाराष्ट्र ऑलम्पिक संघटनेचे उपाध्यक्ष संजय शेटे, सहसचिव दयानंद कुमार व सदस्य डॉ.उदय डोंगरेयांचा औरंगाबाद नागरी सत्कार आमदार अंबादासजी दानवे तसेच शहर जिल्हा अध्यक्ष भाजप संजय केणेकर, क्रीडा उपसंचालिका औरंगाबाद उर्मिला मोराळे यांच्या हस्ते पार पडणार आहे.
सत्कारानंतर महाराष्ट्र ओलंम्पिक संघटनेचे महासचिव नामदेवजी शिरगांवकर हे सर्व एकविध क्रीडा संघटनेच्या पदा धिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत.तरी जिल्ह्यातील सर्व एकविध संघटनेच्या अध्यक्ष सचिवा सह पुरस्कारार्थी/राष्ट्रीय खेळाडू खेळाडू, मार्गदर्शका सह उपस्थित राहावे असे आवाहन डॉ.दत्तभाऊ पाथरीकर डॉ. फुलचंद सलामपुरे,डॉ. प्रदीप खांडरे,रणजित भारद्वाज, पंकज भारसाखळे,गोकुळ तांदळे,निरज बोरसे,एकनाथ साळुंके, मकरंद जोशी, सिद्धार्थ पाटील,अभय देशमुख, सतिष पाठक, तात्या जोशी,संदीप जगताप, दीपक रुईकर,गणेश बेटूदे, अरुण भोसले,दिनेश वंजारे,सुरेश मिरकर,महेश इंदापुरे, कुलजीत सिंग दरोगा, गणेश कड,डॉ.गोविंद शर्मा, औरंगाबाद जिल्हा एकविध क्रीडा संघटना मार्फत सत्कार करण्यात येत आहे.