पुणे :- टेनिस एसेस यांच्या वतीने आणि पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या संलग्नतेने पीएमडीटीए मानांकन वरिष्ठ व हौशी टेनिस स्पर्धेत बाद फेरीत अंकित कापसे, नरेश अरोरा, नरेंद्र पवार, अमित शर्मा या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून पहिल्या फेरीत प्रवेश केला.
एसेस स्पोर्ट्स अरेना टेनिस कोर्ट उंड्री येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत बाद फेरीत एकेरीत अंकित कापसेने संभाजी चव्हाणचा 6-0 असा एकतर्फी पराभव केला.अमित शर्माने जशमीत सहानीचा 6-1 असा सहज पराभव करून आगेकूच केली. नरेश अरोरा व नरेंद्र पवार यांनी मनीष बडवे व विनोद क्षीरसागर यांचा 6-3अशा सारख्याच फरकाने पराभव करून पहिली फेरी गाठली.
निकाल: एकेरी: बाद फेरी:
अंकित कापसे वि.वि.संभाजी चव्हाण 6-0;
नरेश अरोरा वि.वि.मनीष बडवे 6-3;
नरेंद्र पवार वि.वि.विनोद क्षीरसागर 6-3;
रवी कोठारी वि.वि.राहुल भोई 6-2;
अमित शर्मा वि.वि.जशमीत सहानी 6-1;
दुहेरी: उपांत्यपूर्व फेरी:
सुनील लुल्ला/आदित्य व्यास वि.वि.सचिन माधव/मनीष टिपणीस 6-1;
अभिषेक चव्हाण/संजय सेठी वि.वि.अंकित कापसे/अमित किंडो 7-5;
अमित शर्मा/रातीश वि.वि.नितीन सावंत/वेंकटेश आचार्य 6-4;
रवी कोठारी/राहुल कोठारी वि.वि.संभाजी चव्हाण/विनोद क्षीरसागर 6-2.