औरंगाबाद(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य सोफ्टबॉल असोसिएशन अंतर्गत औरंगाबाद जिल्हा सोफ्टबॉल असोसिएशन द्वारा व औरंगाबाद महानगरपालिका यांच्या सहकार्याने आयोजित
विभागीय क्रीडा संकुल गारखेडा औरंगाबाद येथे राज्यस्तरीय ज्युनियर सॉफ्टबॉल स्पर्धेचे उदघाटन महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे महासचिव नामदेव शिरगावकर यांनी स्लगर ला टोला मारून केले.
तसेच उद्घाटन प्रसंगी राज्य स्कवॉश संघटनेचे दयानंद कुमार, औरंगाबाद विभागाच्या क्रीडा उपसंचालिका श्रीमती उर्मिला मोराळे, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती कविता नावंदे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी डॉ.उदय डोंगरे, एकनाथ साळुंके,राज्य सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव डॉ.प्रदीप तळवेलकर, डॉ.सुरज सिंग येवतिकर, राज्य कामगार गुणवंत पुरस्कार्थी फकीरराव घोडे, नाजुक पखाले,मिलिंद तळेले, मिलिंद दर्प, किशोर चौधरी,गोकुळ तांदळे, बिपिन सूर्यवंशी,क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे,डॉ.संदीप जगताप,विनोद माने,संतोष aखेडे,संदीप लंबे,नीरज बोरसे, दिपक रुईकर,प्रदीप बोरसे, प्रवीण शिंदे हे होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृत बिऱ्हाडे यांनी केले.अनंतपूर येथे झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेत विजयी झालेल्या सुवर्ण पदक प्राप्त केलेल्या वरिष्ठ महाराष्ट्र मुले संघातील खेळाडूंना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
तसेच उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे महासचिव यांनी आपल्या भाषणात खेळाडूंना टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघाच्या कामगिरी बद्दल सांगितले तसेच 2024 साली होणाऱ्या ऑलम्पिक मध्ये महाराष्ट्रातील खेळाडू चमकतील असे सांगितले.
आज झालेल्या सामन्यांमध्ये प्रमोध वाघमोडे,आदित्य आखरे(औरंगाबाद)राजवैभव भोसले,यश थोरात (औरंगाबाद)चौखंडे,परिमल धर्मे(अकोला)कुणाल भंगाडे माणस पाटील(जळगाव ) दिव्य पाटील,पायल बडगुजर (जळगाव) मित मिष्रा, हर्ष परियाल (वर्धा ) दूर्वा बंगाले (नागपूर), सानिका कांबळे (कोल्हापूर)यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.
आज झालेल्या सामन्यासाठी पंच म्हणून विकास वानखेडे, सुयोग, सुजय कल्पेकर,अक्षय येवले, स्वप्नील राऊत,चेतन महाडिक,स्वप्नील गदादे, रेवणननाथ शेलार,यांनी काम पहिले.
स्पर्धा पार पाडण्यासाठी गणेश बेटूदे सागर रुपवते, संतोष आवचार,अक्षय बिरादार, स्वरूप घुले, मोहन शिंदे,नितेश लांडगे,संतोष रुईकर, सादत खान,रोहित तुपारे,मयुरी चव्हाण, ईश्वरी शिंदे,भीमा मोरे,परिश्रम घेत आहे.
सामन्यांचे निकाल
मुले विभाग
1) सोलापूर मनपा वि. वि जळगाव मनपा (5-3)होमरन
2) औरंगाबाद मनपा वि.वि सोलापूर जिल्हा (8-6)होमरन
3) अकोला मनपा वि. वि नवी मुंबई (3-1)होमरन
4) मुंबई उपनगर वि.वि जळगाव जिल्हा (12-0) होमरन
5)अकोला जिल्हा वि. वि. यवतमाळ(4-2)होमरन
6)लातूर वि. वि परभणी (9-1)होमरन
7)कोल्हापूर वि. वि सिधुदुर्ग (8-0)होमरन
*मुली विभाग*
1) कोल्हापूर वि. वि. अकोला जिल्हा (8-0)होमरन
2)सांगली वि. वि नवी मुंबई (2-0)होमरन
3)जळगाव वि. वि लातूर (4-0) होमरन
4)नागपूर वि. वि पुणे जिल्हा (4-0)होमरन