सौरभ सालपेची फुटबॉल आर्मी चॅम्पियनशिपसाठी निवड

कोल्हापूर(प्रतिनिधी):-लखनौ येथे होणाऱ्या आर्मी चॅम्पियनशिपसाठी स्पर्धेसाठी कोल्हापूरचा फुटबॉलपटू सौरभ सालपे याची निवड झाली आहे. तो सेंट्रल फॉरवर्डला खेळणार आहे. २५ ते ३१ ऑक्टोंबरदरम्यान हे सामने खेळले जाणार आहेत.२०१२ मधील सुब्रोतो मुखर्जी इंटरनॅशनल, राज्यस्तरीय, राज्य व राष्ट्रीय शालेय स्तरावरील स्पर्धा, दक्षिण कोरिया येथील १८ वर्षाखालील स्पर्धेत त्याने यशस्वी कामगिरी बजावली.

क्रीडा प्रबोधिनीचे जयदीप अंगिरवर, पीटीएमचे शरद माळी यांचे मार्गदर्शन त्याला लाभले.

You might also like

Comments are closed.