औरंगाबाद (प्रतिनिधी):चेस अकॅडमी आयोजित १५ वर्षाआतील बुद्धिबळ स्पर्धेत साक्षी चव्हाण हिने विजेतेपद पटकावले.
कलश मंगल कार्यालय येथे झालेल्या १५ वर्षाआतील बुद्धिबळ स्पर्धेत सात फेऱ्यांमध्ये अपराजित रहात साक्षी चव्हाण हिने सात गुणांसह विजेतेपद पटकावले तर सहा गुणांसह आर्यन सोनवणे याने उपविजेतेपद संपादन केले.
स्पर्धेचे बक्षीस वितरण औरंगाबाद जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव हेमेंद्र पटेल, महिला राष्ट्रीय पंच प्रीती समदाणी, औरंगाबाद चेस अकॅडमीचे संचालक अमरीश जोशी, मुख्य पंच पुष्कर डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन बापू सोनवणे यांनी केले तर आभार केतन अवलगावकर यांनी मानले.
स्पर्धेमध्ये सात, नऊ, अकरा तसेच तेरा या वयोगटातील खेळाडूंना प्रोत्साहन बक्षिसे देण्यात आले.
अंतिम निकाल
प्रथम : साक्षी चव्हाण (सात गुण), द्वितीय : आर्यन सोनवणे (सहा गुण), तृतीय : संचिता सोनवणे (साडेपाच गुण), चतुर्थ : हर्षवर्धन झंवर (साडेपाच गुण), पाचवा : पलक सोनी (साडेपाच गुण)
सात वर्षाआतील : १) अद्विक क्षीरसागर, २) गार्गी ढोबळे, ३) सात्विक ठेंगडे
नऊ वर्षाआतील : १) शुभ समदाणी, २) हिंदवी यादव, ३) पार्थ लोमटे
अकरा वर्षाआतील : १) कौस्तुभ वाघ, २) आदित्य पवार, ३) विशुद्धि कांबळे
तेरा वर्षाआतील : १) अर्णव तोतला, २) राजवर्धन झंवर, ३) सानिका माळी
विशेष बक्षीस (बाल खेळाडू): १) रुद्र चव्हाण, २) सायली चव्हाण