पाच वर्षापूर्वी पनामा पेपर लिंक प्रकरणाने संपूर्ण जगभर खळबळ उडाली होती.पेपर मध्ये जगातील अनेक बड्या व्यक्तींच्या बनावट कंपन्या आणि टैक्स चोरीचे सत्य उघडकीस आलं होतं. आता पुन्हा एकदा आयसीआयजे या संस्थेने नवा गौप्यस्फोट केला आहे.पैंडोरा पेपर्स असे या प्रकरणाचे नाव असून यामध्ये महान क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांचे देखील नाव आहे.
जगभरातील 1.19कोटी कागदपत्रांची छाननी करून हे काळे पैशांचे रहस्य जगासमोर आल्याचा दावा आईसीआईचजे या संस्थेने केला आहे. एकूण 117 देशांमधील 600 पत्रकारांनी या तपासात भाग घेतला आहे. भारतामध्ये इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रात हा अहवाल सविस्तरपणे छापण्यात आला आहे.
या रिपोर्ट मध्ये भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचाही सहभाग असल्याचा दावा संस्थेने केला आहे. या रिपोर्ट मध्ये 300 पेक्षा जास्त भारतीयांची नावे आहेत.त्यांच्यासंबंधी चे पुरावे गोळा केले असून आगामी काळात याबाबत गौप्यस्फोट केला जाईल अशी माहिती या संस्थेने दिली आहे