आयओसीच्या आदेशांचे पालन करणे गरजेचे आहे. क्रीडा क्षेत्रात कोणत्याही प्रकारच्या भेदभावाला थारा नाही.
युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचे रशियाला गंभीर परिणाम भोगावे लागत आहेत. आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाने (आयएसएसएफ) रशिया आणि बेलारूसमधील खेळाडूंना नेमबाजीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धामधून हद्दपार करण्याचा निर्णय बुधवारी घेतला.
सध्या कैरो (इजिप्त) येथे विश्वचषक नेमबाजी स्पर्धा सुरू असून या स्पर्धेत रशियाचे नेमबाजही सहभागी झाले आहेत; परंतु ‘आयएसएसएफ’ने घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांना उर्वरित स्पर्धेतून नाइलाजास्तव माघार घ्यावी लागेल. युक्रेनशी युद्ध पुकारल्यामुळे जगभरातील क्रीडा संघटनांनी रशियावर बहिष्कार टाकावा, असे आवाहन आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) सोमवारी केले.

फरहानशी लग्नानंतर प्रेग्नन्सीच्या चर्चांवर शिबानी दांडेकरनं सोडलं मौन, म्हणाली…
आयओसीच्या आदेशांचे पालन करणे गरजेचे आहे. क्रीडा क्षेत्रात कोणत्याही प्रकारच्या भेदभावाला थारा नाही. युक्रेनवरील हल्ल्याचा आम्हाला खेद असून पुढील आदेशांपर्यंत रशिया आणि बेलारूसमधील सर्व नेमबाजांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागास मनाई असेल,’’ असे ‘आयएसएसएफ’ने निवेदनात म्हटले. मुख्य म्हणजे ‘आयएसएसएफ’चे अध्यक्ष व्लादिमीर लिसिन आणि सरचिटणीस अॅलेक्झांडर रँट्नर हे रशियाचेच नागरिक आहेत.
रशियावर आतापर्यंत फुटबॉल, हॉकी, रग्बी, बॅडिमटन, आइस स्केटिंग, व्हॉलीबॉल यांसह आणखीही काही खेळांतील संघटनांकडून निलंबन लादण्यात आले आहे. जलतरण, अॅथलेटिक्सच्या संघटनांनी त्यांच्याविरोधात सावध पावित्रा स्वीकारला आहे. मात्र युक्रेनमधील स्थिती अधिक बिघडल्यास रशियाचे संपूर्ण क्रीडा क्षेत्र उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे.