नवी दिल्ली – रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि बेलारूस यांच्यात २६ मार्च रोजी होणारा आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण फुटबॉल सामना रद्द करण्यात आला आहे. भारतीय संघ २३ मार्चला बहरीनविरुद्ध खेळणार असून त्यानंतर २६ तारखेला भारत बेलारूसशी दोन हात करणार होता. बेलारूसच्या जागी अन्य एखाद्या संघाशी भारताला खेळवण्यात येईल.
रशियन अॅथलीट्स पॅरालिम्पिकमध्ये खेळणार असून,
तसेच बीजिंग येथे ४ मार्चपासून सुरू होणाऱ्या हिवाळी पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत रशिया आणि बेलारूसच्या क्रीडापटूंना सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र या स्पर्धेत ते देशाचे प्रतिनिधित्व करू शकणार नाहीत. तसेच त्यांनी मिळवलेल्या पदकांचाही गुणतालिकेत समावेश केला जाणार नाही. १३ मार्चपर्यंत खेळवण्यात येणाऱ्या हिवाळी पॅरालिम्पिकमध्ये ७१ रशियन आणि २० युक्रेनचे खेळाडू असतील.