न्यूझीलंडविरुद्ध टी२० मालिकेतील पहिला सामना जयपूरमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने पाच विकेट्स राखून न्यूझीलंडवर विजय मिळवला. या विजयानंतर आता भारतीय संघाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या टी२० मालिकेत भारताचा युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने संघात पुनरागमन केले आहे. दरम्यान, भारताच्या फलंदाजीवेळी सिराजसोबत घडलेल्या एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत रोहित शर्माने सिराजच्या कानाखाली मारलेली दिसत आहे.
रोहितने सिराजच्या कानाखाली मारलेला व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. चाहत्यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हिडिओला प्रचंड व्हायरल केले आहे आणि त्याच्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. रोहितने मस्करीमध्ये ही कानाखाली मारल्याचे दिसत आहे. सामन्यादरम्यान भारतीय खेळाडू डगआउटमध्ये बसलेले होते आणि भारतीय संघ विजयाच्या जवळ चालला होता. त्यावेळी रोहित मोहम्मद सिराजसोबत मस्ती करत होता आणि त्याच वेळी कॅमेरामॅन या घटनेला कॅमेर्यात कैद केले. व्हिडिओत रोहित मस्करीमध्ये सिराजला मागून कानाखाली मारत आहे.
दरम्यान, या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकली आणि न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ विकेट्सच्या नुकसानावर १६४ धावा केल्या. न्यूझीलंडने दिलेल्या १६५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने ५ विकेट्सच्या नुकसानावर आणि १९.४ षटकांमध्ये विजय मिळवला. सामन्यात अश्विनची भूमिका महत्वाची राहिली.
Why did Rohit hit Siraj🤣🤣🙄#INDvNZ #RohitSharma pic.twitter.com/EjqnUXts3v
— Bhanu (@its_mebhanu) November 17, 2021
–
भारतासाठी सर्वाधिक धावा तिसऱ्या क्रमांकावर फलंदासाठी आलेल्या सूर्यकुमर यादवने (६२) केल्या. तसेच सलामीवीर रोहित शर्माने (४८) महत्त्वाचे योगदान दिले. सलामीवीर केएल राहुल १५ धावा करून स्वस्तात बाद झाला. भारतासाठी भुवनेश्वर कुमारनेही उत्कृष्ट गोलंदाजी केली आणि २४ धावा देऊन २ महत्वाच्या विकेट्स घेतल्या. तर दुसरीकडे न्यूझीलंडसाठी सर्वाधिक ७० धावा सलामीवीर मार्टिन गप्टिलने केल्या. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी२० मालिकेचा दुसरा सामना १९ नोव्हेंबरला खेळलाजाणार आहे.