आयपीएल च्या दुसऱ्या पर्वाच्या दुसऱ्या सामन्यात केकेआर ने आरसीबीचा एक तर्फी सामन्यात 9 विकेट्सनी धुव्वा उडवला. केकेआर चा स्पिनर गोलंदाज वरून चक्रवती सामनावीर ठरला. त्याने चार षटकात13 धावांच्या मोबदल्यात 3 गडी बाद करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या विजयाने केकेआर ने 6 अंका सह पॉईंट टेबल मध्ये पाचव्या स्थानावर उडी घेतली आहे. तर आरसीबी दहा अंका सह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
आरसीबी ने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांचा हा निर्णय सपशेल अपयशी ठरला. आरसीबी चे तब्बल सात फलंदाज दुहेरी आकडाही पार करू शकले नाही. कर्णधार विराट कोहली व स्टार खेळाडू एबी डिव्हिलियर्स हे आपल्या नावाप्रमाणे प्रदर्शन करू शकले नाही. फक्त 22 धावा करणारा देवदत्त डेक्कन हा आरसीबी चा टॉप स्कोरर ठरला. केकेआर कडून चक्रवर्ती शिवाय लॉकी फर्ग्युसन, व आंद्रे रसेल ने प्रत्येकी दोन गडी बाद केल्या. धावांचा पाठलाग करीत असताना केकेआर च्या सलामीवीरांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. शुभमन गिल व व्यंकटेश अय्यर ने पहिल्या गाडीसाठी 82 धावा करून सामना लवकर संपविला. शुभमन गिल 48 धावा करून युजवेंद्र चहल चा बळी ठरला.तर व्यंकटेश अय्यरने नाबाद 41 धावांचे योगदान दिले. उद्या पंजाब समोर राजस्थानचे आवाहन असणार आहे.