जडेजाच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने आतापर्यंत ११२ षटकांत ४६८ धावा केल्या.भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेचा पहिला सामना मोहाली येथे खेळवला जातोय. कसोटी सामन्याचा आजचा दुसरा दिवस आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी ऋषभ पंतची चर्चा झाली. तर आज रविंद्र जडेजा सुसाट फलंदाजी करताना दिसतोय. जाडेजाने १६१ चेंडूमध्ये शतक झळकावले असून अजूनही तो मैदानात पाय रोवून आहे. जडेजाच्या या दमदार खेळीमुळे भारताने ४५० धावांचा टप्पा ओलांडला आहे. भारताचे सात गडी बाद झाले आहेत.
रविंद्र जडेजाचे दमदार शतक
रविंद्र जडेजाने दमदार खेळ करत शतक झळकावले.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेचा पहिला सामना मोहाली येथे खेळवला जातोय. कसोटी सामन्याचा आजचा दुसरा दिवस आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी ऋषभ पंतची चर्चा झाली. तर आज रविंद्र जडेजा सुसाट फलंदाजी करताना दिसतोय. जाडेजाने १६१ चेंडूमध्ये शतक झळकावले असून अजूनही तो मैदानात पाय रोवून आहे. जडेजाच्या या दमदार खेळीमुळे भारताने ४५० धावांचा टप्पा ओलांडला आहे. भारताचे सात गडी बाद झाले आहेत.
रविंद्र जडेजाचे दमदार शतक
कालच्या सहा बाद ३५७ धावांवरुन कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात झाल्यानंतर आज जडेजा आणि अश्विन ही जोडी मैदानात उतरली. या जोडीने सुरुवातीपासून धावफलक फिरता ठेवल्यामुळे भारतीय संघाने ४५० धावांचा टप्पा ओलांडला. आज सुरुवातीपासून मैदानावर भारतीय फलंदाजांचे वर्चस्व असल्याचे पाहायला मिळतेय. जडेजा आणि अश्विन या जोडीने शतकी भागिदारी केली. तर जडेजाने दमदार खेळीच्या जोरावर १६१ चेंडूमध्ये आपले शतक पूर्ण केले. अजूनही जडेजा मैदानवर पाय रोवून असून सध्या जेवणाचा ब्रेक झाला आहे. तर दुसरीकडे आर अश्विननेही उत्कृष्ट खेळी करत ६१ धाव्या केल्या. सध्या जयंत यादव मैदानात उतरला आहे. तर दुसरीकडे श्रीलंकन गोलंदाजांनी अश्विन आणि जडेजा ही जोडी तोडण्याचा अटोकाट प्रयत्न केला. अखेर श्रीलंकन गोलंदाज लकमल याने आर. अश्विनला ६१ धावांवर तंबूत पाठवण्यात यश मिळवले.