नवी दिल्ली : आयपीएल फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्सने टीम इंडियाचा स्टार ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विनला लीगच्या 2022 हंगामासाठी कायम ठेवले नाही. अश्विनने चार वेळा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) सोबत आयपीएलमधील कारकिर्दीची सुरुवात केली. 2008 ते 2015 पर्यंत तो महेंद्रसिंग धोनीच्या संघाचा भाग होता. पण त्यानंतर तो पुणे सुपर जॉइंट्स, पंजाब किंग्ज आणि या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग होता.
पुढच्या मोसमात दिल्ली कॅपिटल्सने कायम न ठेवल्याने अश्विनने पुन्हा एकदा सीएसकेकडून खेळण्याचे संकेत दिले आहेत. अश्विन आता मेगा लिलावात उतरेल आणि त्याला लखनऊ किंवा अहमदाबादमधील कोणत्याही संघाकडून करार न मिळाल्यास तो लिलावासाठी जाईल आणि तिथे त्याला सीएसके खरेदी करू शकेल. या स्टार ऑफ स्पिनरने धोनीच्या संघाकडून खेळण्याचे संकेतही दिले आहेत.
अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर ’40 शेड्स ऑफ अॅश’ वर चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की सीएसके फ्रँचायझी त्याच्या हृदयाच्या सर्वात जवळ आहे आणि म्हणून त्याला ‘घर वापसी’ करायला आवडेल. पण त्याचे चेन्नई सुपर किंग्जमध्ये पुनरागमन लिलावावर अवलंबून आहे, असेही त्याने नमूद केले. ऑफस्पिनर म्हणाला, ‘सीएसके ही माझ्या हृदयाच्या सर्वात जवळची फ्रेंचायझी आहे. माझ्यासाठी सीएसके ही शाळेसारखी आहे. इथून मी प्री केजी, एलकेजी, यूकेजी, प्राथमिक शाळेत प्रवेश घेतला, त्यानंतर मी माझे माध्यमिक विद्यालय केले आणि त्यानंतर हायस्कूल आणि 10वी सुरू केली.
तो पुढे म्हणाला, ‘मी माझी अकरावी आणि बारावी एक-दोन वर्षे बाहेर केली. मग मी काही वर्षे ज्युनियर कॉलेज केले. पण सगळं आटोपल्यावर साहजिकच पुन्हा मलाही घरी यायला आवडेल. पण हे सर्व लिलावावर अवलंबून आहे. असं अश्विन म्हणाला आहे.