आयपीएलच्या दुसऱ्या पर्वा मध्ये तिसऱ्या सामन्यात राजस्थान शेवटच्या क्षनी गोलंदाजांनी केलेल्या
चांगल्या कामगिरीच्या जोरावर रोमांचक सामन्यात पंजाबला दोन धावांनी पराभूत केले. राजस्थान ने प्रथम फलंदाजी करून 185 धावा केल्या होत्या. तर पंजाब समोर 186 धावांचे आव्हान होते. पंजाबचे सलामीवीर कर्णधार के एल राहुल व मयंक अगरवाल यांनी संघाला 120 धावांची भागीदारी करत संघाचा विजय निश्चित केला मात्र डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजांनी चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केल्यामुळे पंजाबला पराभवाला सामोरे जावे लागले. शेवटच्या षटकात पंजाबला चार धावांची आवश्यकता होती. पण कार्तिक त्यागी ने चार धाव सक्सेसफुल रित्या डिफेन्ड केले.
नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करीत असताना राजस्थान यशस्वी जयस्वाल 49 व महिपाल लोमारोर 44 यांच्या बळावर 185 धावा पर्यंत मजल मारली होती. तर पंजाब कडून अर्षदीप सिंग याने 5 तर मोहम्मद शमीने तीन गडी बाद केले होते. धावांचा पाठलाग करीत असताना पंजाब संघाला सलामीवीरांनी चांगली सुरुवात करून दिली. पंजाब कडून मयंक अगरवाल ने सर्वाधिक 66 धावा केल्या तर कर्णधार के एल राहुल ने 49 धावा केल्या तसेच निकोलस पूरन पुणे 32 धावांचे योगदान दिले. राजस्थान कडून कार्तिक त्यागी ने 2, तसेच राहुल तेवटीया व चेतन साकारीयाने प्रत्येकी एक गडी बाद केला. या विजयामूळे राजस्थान रॉयल्स ने आठ सामन्यात 8 अंका सह सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे. तर कार्तिक त्यागी ने पटकावला सामनावीराचा पुरस्कार किंग्स इलेव्हन पंजाब नऊ सामन्यात सहा अकांसह सातव्या स्थानावर आहे. उद्या दिल्ली समोर हैदराबादचे आवाहन असणार आहे.