हरियाणा-क्रीडा क्षेत्रातून एक धक्कादायक आणि मनाला चटका लावणारी बातमी समोर आली. आज महाराष्ट्रातील धावपटू बंडू वाघमोडे याचा हरियाणात मृत्यू झाला आहे. स्पर्धा सुरू असताना बंडू वाघमोडे या मैदानात कोसळला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. या वृत्ताने संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
धावपटू बंडू वाघमोडे हा सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील रहिवासी होता. हरियाणातील रोहतक येथे आंतरराज्य मैदानी स्पर्धांचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बंडू वाघमोडे हा हरियाणात गेला होता. बंडू वाघमोडे हा महाविद्यालयात शिक्षण घेत होता. बंडू वाघमोडे हा महाविद्यालयात शिक्षण घेत होता आणि तो अवघ्या 21 वर्षाचा होता.
मिळालेल्या माहितीनुसार, बंडू वाघमोडे हा ग्रामीण भागातील असून त्याचे वडील हे मेंढपाळ आहे. बंडू हा महाविद्यालयातील दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. त्यासोबतच इतर कामे ही करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी वडिलांना हातभार लावत होता. बंडू याला सैन्य दल किंवा पोलीस दलात जाण्याची इच्छा होती, मात्र काळाने घात केला.