चेन्नई – मिस्टर आयपीएल म्हणून ओळखला जाणारा तसेच आयपीएल ही स्पर्धा अगदी सुरुवातीपासून गाजवणारा अनुभवी खेळाडू म्हणजे सुरेश रैना. मात्र याच सुरेश रैनाला १५ व्या पर्वाआधी झालेल्या महालिलावामध्ये कोणत्याही संघाने विकत घेतलं नाही. रैना अनसोल्ड राहिल्याने अनेकांनी नाराजी व्यक्ती केली. चेन्नई सुपर किंग्सकडून मागील अनेक वर्षांपासून खेळणाऱ्या रैनाला लिलावामध्ये कोणत्याही संघाने विकत घेण्यात रस दाखवला नाही.
चेन्नईने तरी रैनासाठी बोली लावायला हवी होती असं मत अनेक चाहत्यांनी व्यक्त केलंय. अनेकांनी तर सीएसकेने रैनाला चुकीची वागणूक दिल्याचाही आरोप केलाय. मात्र आता रैनाला चेन्नईने विकत का घेतलं नाही याचा खुलासा चेन्नई सुपर किंग्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी असणाऱ्या काशी विश्वनाथन यांनी केलाय.
आयपीएलमधील सर्वात यशस्वी डावखुऱ्या फलंदाजांच्या यादीत समावेश असणाऱ्या रैनाने आतापर्यंत आयपीएलमध्ये २०५ सामने खेळले आहेत. यात त्याने एक शतक आणि ३९ अर्थशतकं साजरी केलीयत. एकूण ५ हजार ५२८ धावा त्याने केल्यात. तसेच तो गुजरात लायन्स संघाचा कर्णधारही राहिलाय. २०२० मध्ये करोनाच्या पार्श्वभूमीवर त्याने लीग न खेळण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्यासाठी मागील पर्व काही खास राहिलं नाही. त्याने १२ सामन्यांमध्ये एक अर्धशतक करत एकूण १६० धावा केल्या