रहाणे मुंबईच्या रणजी संघात तर पृथ्वीकडे नेतृत्वाची धुरा;

मुंबई  – खेळताना धावांसाठी झगडणारा मधल्या फळीतील फलंदाज म्हणून ओळखला जाणारा भारतीय संघाकडून अजिंक्य रहाणेच मंगळवारी जाहीर झालेल्या मुंबईच्या रणजी संघात समावेश करण्यात आला आहे. याचप्रमाणे संघाचे नेतृत्व पृथ्वी शॉ याच्याकडे सोपवण्यात आले आहे.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये बलाढ्य मानल्या जाणाऱ्या ४१ वेळा विजेत्या मुंबईचा ड-गटात समावेश करण्यात आला आहे. या गटात सौराष्ट्र, ओडिशा आणि गोवा हे अन्य तीन संघ आहेत. अष्टपैलू अर्जुन तेंडुलकर, यष्टीरक्षक-फलंदाज आदित्य तरे व वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी यांनाही संघात स्थान मिळाले आहे.

संघ : पृथ्वी शॉ (कर्णधार), अजिंक्य रहाणे, यशस्वी जैस्वाल, आकर्षित गोमेल, अरमान जाफर, सर्फराज खान, सचिन यादव, आदित्य तरे (यष्टीरक्षक), हार्दिक तामोरे (यष्टीरक्षक), शिवम दुबे, अमन खान, शम्स मुलानी , तनुष कोटियन, प्रशांत सोलंकी, शशांक अत्तार्डे, धवल कुलकर्णी, मोहित अवस्थी, प्रिन्स बदियानी, सिद्धार्थ राऊत, रॉयस्टन डायस, अर्जुन तेंडुलकर याचा समावेश आहे.

You might also like

Comments are closed.