पुणे(प्रतिनिधी): पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे आयोजित पीवायसी रिबाऊंड रॅकेट लीग स्पर्धेत उपांत्य फेरीत तलवार्स व मस्किटर्स या संघांनी अनुक्रमे एक्स्कॅलिबर्स् व समुराईज संघांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.पीवायसी हिंदू जिमखानाच्या टेबलटेनिस, टेनिस व बॅडमिंटन कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात तलवार्स संघाने एक्स्कॅलिबर्स् संघाचा 564-535 असा पराभव करून दिमाखात अंतिम फेरी गाठली. टेनिस प्रकारात अभिषेक ताम्हाणे, मधुर इंगळहाळीकर, अभिजीत खानविलकर, शान मदन, देवेंद्र चितळे, नेहा ताम्हाणे, विराज खानविलकर, कर्ना मेहता 13-20 यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर एक्स्कॅलिबर्स् संघाने तलवार्स संघाचा 159-147 असा पराभव करून आघाडी घेतली.
पण टेबल टेनिसमध्ये रोहन छाजेड, राहुल पाठक, शिल्पा पांडे, कौस्तुभ देशपांडे, अंकित दामले, आर्य देवधर, ईशान भाले, अविनाश दोशी, गिरीश मुजुमदार, अक्षय ओक यांच्या सुरेख खेळीच्या जोरावर तलवार्स संघाने एक्स्कॅलिबर्स्चा 206-196 असा पराभव करून हि आघाडी भरून काढली. त्यानंतर बॅडमिंटन प्रकारात तलवार्स संघाने एक्स्कॅलिबर्स् संघाचा 211-180 असा पराभव करून विजय मिळवला. तलवार्सकडून आर्य देवधर, मकरंद चितळे, तेजस किंजवडेकर, अंकित दामले , मिहीर आपटे, अविनाश दोशी, राहुल पाठक, वेदांत क्षीरसागर यांनी अफलातून कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत मस्किटर्स संघाने समुराईज संघाचा 404-284 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य फेरी:
तलवार्स वि.वि. एक्स्कॅलिबर्स् 564-535
टेनिस: तलवार्स पराभूत वि. एक्स्कॅलिबर्स् 147-159(रोहन छाजेड/रोहन जमेनिस वि.वि.अमोल काणे/संग्राम पाटील 30-21; शिव जावडेकर/तेजस किंजवडेकर पराभूत वि.अभिषेक ताम्हाणे/मधुर इंगळहाळीकर 18-30; कुणाल भुरट/शरयू राव पराभूत वि.अभिजीत खानविलकर/शान मदन 8-30; राहुल पाठक/अवनी क्षीरसागर पराभूत वि.देवेंद्र चितळे/नेहा ताम्हाणे 28-30; अंकित दामले/ईशान भाले वि.वि.सचिन अभ्यंकर/हरीश गलानी 30-12; आर्य देवधर/मकरंद चितळे वि.वि.प्रीती मराठे/विश्वेश कटक्कर 20-16; प्रशांत वैद्य/अक्षय ओक पराभूत वि.विराज खानविलकर/कर्ना मेहता 13-20);
टेबल टेनिस: तलवार्स वि.वि. एक्स्कॅलिबर्स् 206-196(रोहन छाजेड/राहुल पाठक वि.वि.अभिषेक ताम्हाणे/देवेंद्र चितळे 30-15; शिल्पा पांडे/कौस्तुभ देशपांडे वि.वि.मधुर इंगळहाळीकर/अजित बेलवलकर 30-29; तेजस किंजवडेकर/कुणाल भुरट पराभूत वि.आनंद शहा/संग्राम पाटील 28-30; रोहन जमेनिस/मनीष शहा पराभूत वि.राधिका इंगळहाळीकर/विश्वेश देशपांडे 12-30; मकरंद चितळे/प्रशांत वैद्य पराभूत वि.अमोल काणे/अनिरुद्ध कोंकर 16-30; अंकित दामले/आर्य देवधर वि.वि.कर्ना मेहता/शान मदन 30-24; ईशान भाले/अविनाश दोशी वि.वि.अभिजीत खानविलकर/विश्वेश कटक्कर 30-23; गिरीश मुजुमदार/अक्षय ओक वि.वि.जय गुजर/विराज खानविलकर 30-15)
बॅडमिंटन: तलवार्स वि.वि. एक्स्कॅलिबर्स् 211-180(आर्य देवधर/मकरंद चितळे वि.वि.राधिका इंगळहाळीकर/संग्राम पाटील 30-21; तेजस किंजवडेकर/अंकित दामले वि.वि.देवेंद्र चितळे/हर्षवर्धन आपटे 30-09; मिहीर आपटे/अविनाश दोशी वि.वि.मधुर इंगळहाळीकर/आनंद शहा 30-09; ईशान भाले/प्रशांत वैद्य पराभूत वि.अनिरुद्ध कोंकर/हरीश गलानी 24-30; गिरीश मुजुमदार/अक्षय ओक पराभूत वि.देवेंद्र राठी/कर्ना मेहता 26-30; राहुल पाठक/वेदांत क्षीरसागर वि.वि.अमोल काणे/अभिजीत खानविलकर 30-21; मनिष शहा/हरीश अय्यर पराभूत वि.अभिषेक ताम्हाणे/शान मदन 22-30; रोहन जमेनिस/शिव जावडेकर पराभूत वि.इरा आपटे/विश्वेश कटक्कर 19-30);
मस्किटर्स वि.वि.समुराईज 404-284
टेनिस: मस्किटर्स वि.वि.समुराईज 190-122(पराग चोपडा/रोहन दळवी वि.वि.अमित नाटेकर/अवनी गोसावी 30-20; करण बापट/सार्थक प्रधान वि.वि.नकुल फिरोदिया/निशांत भणगे 30-18; रोनीत मुथा/प्रियदर्शन डुंबरे वि.वि.अमित महाजनी/राहुल गांगल 30-17; शैलेश लिमये/अर्णव काळे वि.वि.आदित्य अभ्यंकर/सौरभ चिंचणकर 30-27; अभिजीत शहा/चिन्मय दांडेकर वि.वि.विमल हंसराज/आशुतोष सोमण 30-17; वेद मोघे/समीर सावळा वि.वि.शारदा बापट/आनंद घाटे 20-0; आदित्य गांधी/अनुष्का परांजपे वि.वि.यश शहा/सचिन बेलगलकर 20-13);
टेबल टेनिस: मस्किटर्स वि.वि.समुराईज 214-162(पराग चोपडा/शिरीष कर्णिक पराभूत वि.आशिष बोडस/सचिन बेलगलकर 17-30; संजय बामणे/वैशाली सोहोनी वि.वि.आनंद घाटे/नितीन कोंकर 30-25; नितीन पेंडसे/अतुल ठोंबरे पराभूत वि.आदित्य अभ्यंकर/अमित नाटेकर 17-30; ,शैलेश लिमये/आदित्य पावनगडकर वि.वि.संजय शहा/सौरभ चिंचणकर 30-18; सार्थक प्रधान/करण बापट वि.वि.आशुतोष सोमण/विनीत रुकारी 30-17; आदित्य गांधी/विनायक भिडे वि.वि.शारदा बापट/अमित महाजनी 30-06; संदीप साठे/रोहन दळवी वि.वि.राहुल गांगल/निशांत भणगे 30-13; प्रियदर्शन डुंबरे/अभिजीत शहा वि.वि.यश काळे/हेमंत पालांडे 30-26).