औरंगाबाद (प्रतिनिधी)भारतीय तलवारबाजी महासंघ व पंजाब राज्य तलवारबाजी संघटनेतर्फे अमृतसर येथे अायोजित वरिष्ठ गट राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत औरंगाबादच्या अभय शिंदे आणि सांगलीच्या गिरीश जाकातेने रौप्यपदक आपल्या नाव केले. हे दोघे औरंगाबादच्या भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे (साई) खेळाडू आहेत.
सायबर प्रकारात उपांत्य फेरीत अभय शिंदेने सैन्य दलाच्या जीशोआ निधीला १४-७ ने पराभूत करत फायनलमध्ये प्रवेश केला होता. फायनलमध्ये अभयला राजस्थानच्या करणसिंगकडून १५-७ ने पराभव स्विकारावा लागला. करणने सुवर्ण व अभयने रौप्यपदक जिंकले. तसेच, इप्पी प्रकारात फायनलमध्ये गिरीश जकातेला यजमान पंजाबच्या उदयवीर सिंगने एकतर्फी लढतीत १५-८ ले हरवत सुवर्णपदक पटकावले. गिरीशने रौप्यपदक आपल्या खात्यात जमा केले. या खेळाडूंना साईचे प्रशिक्षक तुकाराम मेहेत्रे यांचे मार्गदर्शन लाभले. विजेत्या खेळाडूंचे साईचे उपसंचालक नितीन जैस्वाल, राज्य तलवारबाजी संघटनेचे सचिव डॉ. उदय डोंगरे, डॉ. दिनेश वंजारे आदींनी अभिनंदन केले.