पुणे | दरवर्षी खेळली जाणारी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही स्पर्धा महाराष्ट्राची टॉपची असलेली स्पर्धा आहे. या वर्षी ही स्पर्धा चार एप्रिल ते 9 एप्रिल सातारा येथे पार पडणार आहे. खांद्याचे ऑपरेशन मुळे अभिजीत कटके या स्पर्धेत खेळू शकणार नाही.
अभिजीत कटके दरवर्षी या स्पर्धेमध्ये सहभागी होतो, परंतु मागच्या वर्षी अभिजीतच्या खांद्याचे ऑपरेशन झाल्यामुळे त्याला खेळता आलेले नाही. जवळपास सात महिने आराम केला आणि त्याला खेळता आले नाही.
यावर्षी खेळणार असल्याचे विचारल्यास अभिजीत म्हणाला,2020 चे अधिवेशन कोरोनात गेले आणि आता हे 2021 अधिवेशन मी खेळणार नाही परंतु 2022 मध्ये मी नक्की येणार आहे., पुढे म्हणाला कोरोना काळात सर्वजणच अडचणीत आल्यास संपूर्ण देशावर संकट होतं. मी आता अतिशय चांगला चालू असून एकदम फिट आहे आणि नॅशनल आणि इन्टरनॅशनल चे तयारी देखील करणार आहे.
या वर्षी लढत कुणाची होईल? कुठले कुठले खेळाडू चांगली कामगिरी कामगिरी बजावतील.कुठलाही पहिलवान आपल्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी येतो आणि प्रत्येक खेळाडू हा तेवढ्याच ताकदीने खेळतो प्रत्येक खेळाडूला वाटतं माझ्या जिल्ह्याचं नाव झालं पाहिजे त्यासाठी तो प्रयत्न करतो. अभिजीत म असे मत व्यक्त केले आणि महाराष्ट्र केळशीला मी पुढच्या वर्षी नक्की सहभागी होणार असल्याचेही म्हणाला. या स्पर्धेकडे सर्व प्रेक्षकांचे लक्ष लागलेले आहे. ही स्पर्धा कशी पार पडते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.