• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, May 20, 2025
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

पंजाब संघाने राष्ट्रीय वरिष्ठ हॉकी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

by pravin
December 22, 2021
in राष्ट्रीयस्तरीय, हॉकी
पंजाब संघाने राष्ट्रीय वरिष्ठ हॉकी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

पुणे: हॉकी इंडियाच्या ११व्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत हॉकी पंजाबने विजेतेपद मिळविले. चुरशीच्या झालेल्या अंतिम लढतीत त्यांनी उत्तर प्रदेशाचा शूट आऊट मध्ये २-१ असा पराभव केला.

नियोजित वेळेत दोन्ही संघ गोलशून्यची बरोबरी तोडू शकले नाहीत. त्यानंतर घेण्यात आलेल्या शूट आऊटमध्ये पंजाबने बाजी मारली. पंजाबकडून विशाय यादव, मेहकीत सिंग, तर उत्तर प्रदेशकडून केवळ महंमद अमीर खान यालाच गोल करण्यात यश आले. पंजाबकडून रणजोत सिंग, सिंग हरताज औजला यांना गोलरक्षकाला चकवण्यात अपयश आले. उत्तर प्रदेशाकडून अजय यादव, महंमद सादिक, महंमद सैफ खान आणि तरुण अधिकारी हे खेळाडू आपल्या संधी साधू शकले नाहीत.

त्यापूर्वी, तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात कर्नाटकाने यजमान महाराष्ट्राचा ५-२ असा पराभव केला. कर्नाटकाने सामन्याला आक्रमक सुरवात केली. सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला यतिश कुमार याने गोल करताना महाराष्ट्राचा गोलरक्षक आकाश चिकटेला चकवले. त्यानंतर दोन मिनिटांनी अशीच कामगिरी करत कर्णधार महंमद राहिलने गोल करून कर्नाटकाची आघाडी भक्कम केली. महाराष्ट्राचा कर्णधार तालेब शाह याने २४व्या मिनिटाला गोल करून महाराष्ट्राचे आव्हान कायम राखले होते. मध्यंतराला कर्नाटकाने २-१ अशी आघाडी राखली.

उत्तरार्धानंतर तालेबने आणखी एक गोल करून सामन्यात २-२ अशी बरोबरी राखली. उत्तरार्धाची सुरवात महाराष्ट्रासाठी आश्वासक झाली असली, तरी त्यानंतर सामन्यावर कर्नाटकाचे पूर्ण वर्चस्व राखले. बरोबरीनंतर सामन्याच्या ३७व्या मिनिटाला पवन मदिवलार याने कर्नाटकाला पुन्हा आघाडीवर नेले. सोमण्णा एन. डी याने ४५व्या मिनिटाला आघाडी भक्कम केली आणि ५२व्या मिनिटाला लिखित बीएम याने गोल करून कर्नाटकाचा विजय साकार केला.

निकाल –
हॉकी पंजाब ० (२) (शूट आऊटमध्ये विशाल यादव, मेहकीत सिंग) शूट आऊट उत्तर प्रदेश ० (१) (शूटआऊटमध्ये मोहंमद अमीर खान)
हॉकी कर्नाटक ५ (यतिश कुमार ३रे, मोहंमद राहिल ५वे, पवन मदिवलार ३७वे, चिरंथ सोमण्णा एन.डी. ४५वे, लिखिथ बीएम ५२वे मिनिट) वि.वि. महाराष्ट्र २ (तालेब शाह २४वे, ३३वे मिनिट) मध्यंतर २-१

ShareTweetSend
Next Post
आयएसएल: एटीके मोहन बागानचा नॉर्थ ईस्ट युनायटेडवर निसटता विजय

आयएसएल: एटीके मोहन बागानचा नॉर्थ ईस्ट युनायटेडवर निसटता विजय

ताज्या बातम्या

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ - शांभवी जोडीचा अचूक निशाणा

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ – शांभवी जोडीचा अचूक निशाणा

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.