आज आयपीएल मध्ये दुसऱ्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाब समोर हैदराबाद सनरायझर्स चे आव्हान होते. तर यामध्ये लो स्कोरिंग सामन्यात पंजाब ने हैदराबाद वर पाच धावांनी निसटता विजय संपादन केला. या सामन्यांमध्ये जेसन होल्डर ची अष्टपैलू कामगिरी वाया गेली त्याने सामन्यांमध्ये सर्वाधिक तीन गडी बाद करून सर्वाधिक 47 धावा केल्या. उद्या केकेआर समोर चेन्नईचे तर मुंबईसमोर बेंगलोर ते आव्हान असणार आहे.या विजयाचं पंजाबने पॉइंट टेबल मध्ये चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे तर दुसरीकडे हैदराबाद शेवटच्या क्रमांकावर आहे.
नाणेफेक जिंकून हैदराबाद मे प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. गोलंदाजांनी कर्णधाराला निराश केले नाही, हैदराबादच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केल्यामुळे पंजाबने फक्त 125 धावांपर्यंत मजल मारली. पंजाब कडून मारक्रम ने सर्वाधिक 27 तर कर्णधार राहुल ने 21 धावांचे योगदान दिले. तर हैदराबाद कडून होल्डरने सर्वाधिक तीन गडी बाद केले. धावांचा पाठलाग करीत असताना हैदराबाद ची सुरुवात चांगली झाली नाही. तसेच प्रमुख फलंदाजांनी चांगली कामगिरी न केल्यामुळे एकही भागीदारी जमली नाही. तळाला जेसन होल्डर ने फटकेबाजी करून सामना रोमांचक केला परंतु योग्य ती साथ न भेटल्यामुळे संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. होल्डर ने सर्वाधिक 47 धावा केला. तर पंजाब कडून युवा लेग स्पिनर रवी बिशनोई ने तीन गडी बाद करून सर्वांना प्रभावित केले. तर मोहम्मद शमीने दोन गडी बाद केले.