औरंगाबाद (प्रतिनिधी)औरंगाबाद जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशन आणि औरंगाबाद शहर कराटे असोसिएशनच्या नुतन कार्यकारिणीची कराटे दो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे सचिव संदीप गाडे यांनी रविवारी घोषणा केली. जिल्हा संघटनेच्या अध्यक्षपदी प्रा. कैलास जाधव, कार्यध्यक्षपदी डॉ. संदीप जगताप व सचिपदी बळीराम राठोड यांची नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबर, शहर संघटनेच्या अध्यक्षपदी अरुण भोसले आणि सचिवपदी मुकेश बनकर यांची सर्वोनुमते निवड झाली.
निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे औरंगाबाद जिल्हा ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राज्य संघटनेचे अध्यक्ष सलाउद्दीन अन्सारी, संदीप वाघचौरे, अॅड. रेणुका घुले, सुयश नाटकर, श्याम अंभोरे आदींची उपस्थिती होती.
कार्यकारिणी पुढील प्रमाणे :
जिल्हा – अध्यक्ष प्रा. कैलास जाधव, कार्याध्यक्ष डॉ. संदीप जगताप, उपाध्यक्ष अॅड. योगेश ढाेबळे, सचिव बळीराम राठोड, सहसचिव अक्षय सोनवणे, कोषाध्यक्ष प्रताप वाघमारे, सदस्य विलास काकडे, प्रमोद साळुंके, पवन घुगे, योगेश पवार.
शहर – अध्यक्ष अरुण भोसले, उपाध्यक्ष बाबुराव पारखे, सचिव मुकेश बनकर, सहसचिव आशिष लकडे, कोषाध्यक्ष नीलेश घोंगडे, सदस्य विशाल आहिरे, संदीप साखरे, अनिल ठोंबरे, रोहित केतकर, जितू चंदनसे, मिथुन जाधव.
कराटेच्या विकासाठी सर्वांना एका छताखाली आणणार : गाडे
राज्यात व देशात आमच्या संघटनेला मान्यता मिळाली आहे. आम्ही सर्व संबंधीत विभागांशी पत्र व्यवहार केला आहे. आगामी काळात राज्यात एकाच छत्राखाली सर्व कराटे संघटना, प्रशिक्षक, खेळाडू, पंचांना एकत्र आणून खेळाच्या विकासाठी काम करणार आहोत. खेळाडूंना जास्तीत जास्त सुविधा व व्यासपीठ मिळवून देण्याच्या आमचा प्रयत्न राहिल. जिल्हा संघटनेला आवश्यक ती तांत्रिक, आर्थिक मदत आम्ही करणार आहोत, असे महाराष्ट्राचे सचिव संदीप गाडे यांनी म्हटले.