किलियान एम्बापेने भरपाई वेळेत (९० ३ मि.) केलेल्या एकमेव गोलमुळे पॅरिस सेंट-जर्मेनने लीग-१ चषक फुटबॉल स्पर्धेत रेन्स संघावर १-० अशी मात केली. या विजयासह सेंट-जर्मेनने (२४ सामन्यांत ५९ गुण) अग्रस्थानावरील आघाडी भक्कम केली.
दरम्यान, प्रीमियर लीगमध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या मँचेस्टर युनायटेडला साऊदम्पटनने १-१ असे बरोबरीत रोखले. मँचेस्टरसाठी जेडन सँचोने २१व्या मिनिटाला गोल केला, मात्र अॅडम्सने ४८व्या मिनिटाला नोंदवलेल्या गोलमुळे साऊदम्पटनने बरोबरी साधली. २४ सामन्यांत ४० गुण कमावणारा युनायटेडचा संघ सध्या गुणतालिकेत पाचव्या स्थानी असून अग्रस्थानावरील मँचेस्टर सिटीपेक्षा (६३) ते तब्बल २३ गुणांनी पिछाडीवर आहेत.